Video : अखेर दोन महिन्यांनी 'ती' पिंपरी-चिंचवडमध्ये धावली! 

Video : अखेर दोन महिन्यांनी 'ती' पिंपरी-चिंचवडमध्ये धावली! 

पिंपरी : सुमारे दोन महिन्यांच्या काळानंतर पिंपरी-चिंचवडमधील कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी शहराअंतर्गत 30 मार्गांवर पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (पीएमपी) 80 बसगाड्यांनी मंगळवारी (ता. 26) बससेवेला सुरुवात झाली. या मार्गांवर प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. सर्व बसगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी 'सोशल डिस्टन्सिंग'चे काळजीपूर्वक पालन करण्यात आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अत्यावश्‍यक सेवेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस आदींसाठी अत्यावश्‍यक बससेवा देण्यात येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या भागांत काही ठिकाणी शासकीय अटी-शर्तीनुसार उद्योगधंदे सुरू झाल्याने कामगार वर्ग आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी देखील 'पीएमपी'ची बससेवा सुरू केली जावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत 30 मार्गांवर बससेवा देण्याबाबत पीएमपी प्रशासनाने वेळापत्रक निश्‍चित केले होते. या वेळापत्रकानुसार, बससेवेला सुरुवात झाली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग कायम रहावे, यासाठी सर्व बसगाड्यांमधील आसनांवर महिला-पुरुष प्रवाशांसाठी विशिष्ट प्रकारची चिन्हे (मार्किंग) छापण्यात आली होती. त्यानुसारच, प्रवाशांना बसमध्ये बसविण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी आगारामधून 12 मार्गांवर 25 बसगाड्या सोडण्यात आल्या. तर भोसरी आगारामधून सात मार्गांवर 26 गाड्या पाठविण्यात आल्या. तर निगडी आगारामधून 11 मार्गांवर 29 बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले. या सर्व मार्गांवर पीएमपी प्रशासनाने स्वतःकडील बसगाड्या पाठविल्या. याशिवाय या तीनही आगारांकडून अत्यावश्‍यक सेवेसाठीही बसगाड्या पुरविल्या जात आहेत. वैद्यकीय सेवेसाठी आणि पोलिसांच्या मागणीनुसार परप्रांतीय लोकांना पुणे स्टेशन, ऊरुळी कांचन येथे सोडण्यासाठी अन्य गाड्यांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. 
यापूर्वी, केवळ पासधारक प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्येक बसगाड्यांत वाहक पुरविण्यात आला होता. त्याद्वारे, प्रवाशांना रितसर तिकीटे देण्यात आली. या बसगाड्यांमध्ये नवीन सीएनजी आणि मिडी बसेसचा समावेश होता. मिडी बसमध्ये आसन क्षमता 32 इतकी आहे. मात्र, कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग म्हणून 17 आसनांवर 8 महिला आणि 9 पुरुष असे नियोजन करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

असे राहिले नियोजन 

  • प्रत्येक मार्गावर बसेसचे येताना-जाताना निर्जंतुकीकरण 
  • बसस्थानकांवर देखील बसमध्ये औषध फवारणी 
  • मास्कधारक प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com