सेनापती तर मिळाले, सैन्य कधी मिळणार?

मंगेश पांडे
Wednesday, 25 November 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात अनेक वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. विविध विभागांसह ठाण्यांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या अधिकाऱ्यांसह नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमुळे पोलिस ठाण्यांसह इतर विभागांनाही बऱ्यापैकी अधिकारी उपलब्ध झाले आहेत. अधिकारी आले असले तरी कर्मचाऱ्यांची कमतरताच असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस दलात अनेक वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. विविध विभागांसह ठाण्यांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या अधिकाऱ्यांसह नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमुळे पोलिस ठाण्यांसह इतर विभागांनाही बऱ्यापैकी अधिकारी उपलब्ध झाले आहेत. अधिकारी आले असले तरी कर्मचाऱ्यांची कमतरताच असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलाची स्थिती सेनापती मिळाले, मात्र सैन्य कधी मिळणार अशी झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

शहरासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन झाले. पुणे शहर व ग्रामीण पोलिस दलातील मिळून पंधरा पोलिस ठाण्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला. मात्र, सुरुवातीपासूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत बऱ्यापैकी अधिकारी उपलब्ध झाले आहेत. पूर्वीच्या अधिकाऱ्यांसह मागील दोन महिन्यांत नवीन सहायक आयुक्त, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक पिंपरी-चिंचवड पोलिस दलात दाखल झाले आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. अपुऱ्या मनुष्यबळात कामकाज करावे लागत आहे. यामुळे कामकाजात अडचणी येतात. सध्या आयुक्तालयांतर्गत असलेल्या पंधरा पोलिस ठाण्यांसाठी दोन हजार २१ कर्मचारी मंजूर असताना सध्या केवळ एक हजार ४५७ कर्मचारी उपलब्ध आहेत. अशातही साप्ताहिक सुटी, रजा यामुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी होते. 

व्यावसायिक गौतम पाषाणकर का निघून गेले? वाचा सविस्तर

तपासात शिथिलता
अपुऱ्या मनुष्यबळाअभावी जुने गुन्हे उघडकीस आणणे, कायदा-सुव्यवस्था कायम राखणे, तपासासाठी बाहेर जाणे, गस्त घालणे यामध्ये अनेक अडचणी येतात. अशातच मोठा बंदोबस्त, सण, नेत्यांचे दौरे यासाठीही मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. दरम्यान, सध्या पोलिस ठाण्यांमध्ये ऑर्डर देणारे अधिकारी पुरेसे झालेले असले कर्मचाऱ्यांची मात्र वाणवा असल्याचे दिसून येते. 

अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्तांची पुणे विद्यापीठाला भेट 

पोलिस ठाणे निहाय निरिक्षक, सहायक निरिक्षक, उपनिरिक्षक
चिंचवड-७, पिंपरी-१६, भोसरी - १२, भोसरी एमआयडीसी १२, निगडी-१०, दिघी-७, चाकण-५, आळंदी-५, वाकड-१३, हिंजवडी -१३, सांगवी-१२, देहूरोड-१३, तळेगाव-८, तळेगाव एमआयडीसी-५, चिखली-७.

अनेक ठाण्यांत अपुरे मनुष्यबळ
वाढते गुन्हे, मोठी भौगोलिक हद्द, वारंवार कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणे तसेच झोपडपट्ट्यांची संख्या अधिक असलेल्या पोलिस ठाण्यांमध्ये अपुरे मनुष्यबळ आहे. देहूरोड, निगडी, सांगवी, चाकण, हिंजवडी, चिंचवड, भोसरी एमआयडीसी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या ठाण्यांमध्ये खूपच कमी कर्मचारी संख्या आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer pimpri chinchwad