सांगवी ठाण्यातील पोलिस एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

एसीबी पथकाने धडक कारवाई करत सांगवी पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एक वरिष्ठ ही सामील असल्याचे समजते आहे. यामुळे सांगवी पोलिसात खळबळ उडाली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कारवाई सुरू असून, सकाळी याबाबत सखोल तपासाअंती माहिती देण्यात येईल, असे एसीबीच्या पथकाकडून सांगण्यात आले.

जुनी सांगवी - एसीबी पथकाने धडक कारवाई करत सांगवी पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एक वरिष्ठ ही सामील असल्याचे समजते आहे. यामुळे सांगवी पोलिसात खळबळ उडाली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कारवाई सुरू असून, सकाळी याबाबत सखोल तपासाअंती माहिती देण्यात येईल, असे एसीबीच्या पथकाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सांगवी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यातील तक्रारदार यांना पोलिस सुरक्षा पाहिजे, यासाठी ते सांगवी पोलिस ठाण्यात गेले. मात्र, तेथे त्या कर्मचाऱ्याने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी (ता. २१) साडेआठ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई सध्या सुरू असून दरम्यान एसीबीने पकडलेल्या कर्मचारी व एक सहाय्यक उपनिरीक्षक असल्याचे समजते. त्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत अजून किती जणांचे लागेबांधे आहेत, हे सकाळी सखोल चौकशी दरम्यान कळेल, असे एसीबीच्या पथकाकडून सांगण्यात आले. 

कोट्यवधींचे कर्ज माफ होण्यासाठी केला मित्राचा खून; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात  

अधिकाऱ्यांचेही नाव असल्याचे बोलले जात आहे. पण तो अधिकारी कोण याबाबत आत्ताच काही सांगता येणार नसल्याचे एसीबीच्या पथकाकडून सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police in Sangavi Thane caught by ACB Crime