Sakal Impact : मावळातील 'या' गावचा वीजपुरवठा अखेर सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

वीजपुरवठा सुरळीत झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत 'सकाळ'चे आभारही मानले. 

कामशेत (ता. मावळ) : नायगाव जवळील येवलेवाडीतील काही भाग महिनाभर अंधारात होता. आज सायंकाळपर्यत या परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत 'सकाळ'चे आभारही मानले. 

मावळात कोरोना रुग्ण वाढीचा सिलसिला कायम; आजचा आकडाही मोठा

निसर्ग चक्रीवादळात येवलेवाडीतील विजेचा खांब कोलमडून पडला होता. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सात-आठ घरे अंधारातच होती. या बाबत संबंधितांनी महावितरण कार्यालयात तक्रार देऊनही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. शेवटी या बाबतीत सोमवारी 'सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची तातडीने दखल घेत महावितरण, पोलिस प्रशासन आणि गावकरी यांची कामशेत पोलिस ठाण्यात बैठक झाली. 

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो, लॉकडाउनचे हे नविन आदेश जाणून घ्या...

त्यानंतर संबंधितांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विजेचे खांब रोवून वीज तारा ओढून पुरवठा सुरू केला. स्थानिक पातळीवरील गावकऱ्यांना विश्वासात घेऊन भविष्यात दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन सरपंच विजय सातकर यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power supply restore in yeolawadi maval

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: