कांदा बियाणे निर्यात बंदी नेमकी कुणाच्या फायद्याची?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

कांदा बियाण्यांचे भाव सध्या चांगलेच कडाडले आहेत. पावसामुळे कांदा रोपांचे व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नवीन कांदा लागवडीसाठी सध्या रोपांचा तुटवडा भासत असल्याने भाव कडाडले आहेत. नगर, नाशिक भागातून कांदा रोपे लागवडीसाठी आणली जात आहेत.

चाकण : केंद्र सरकारने कांदा बियाणे निर्यात बंदी जाहीर केली आहे. तरी देखील कांदा बियाण्यांच्या एका किलोसाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहे. यामुळे या निर्यात बंदीचा फायदा शेतकऱ्यांना होणार की, बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या होणार, असा प्रश्‍न कांदा उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.

कांदा बियाण्यांचे भाव सध्या चांगलेच कडाडले आहेत. पावसामुळे कांदा रोपांचे व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नवीन कांदा लागवडीसाठी सध्या रोपांचा तुटवडा भासत असल्याने भाव कडाडले आहेत. नगर, नाशिक भागातून कांदा रोपे लागवडीसाठी आणली जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात कांदा रोपांचा व बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाली आहे. यामुळे बहुतांशी शेतकरी नगर, नाशिक जिल्ह्यातून कांदा बियाणे आणत आहेत. कंपन्यांची बियाणे खात्रीशीर नसल्याने शेतकरी घरगुती तयार केलेली बियाणे विकत घेत आहेत.

केंद्र सरकारने कांदा बियाणे निर्यातबंदी केली आहे. याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, याबाबत शेतकऱ्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात सध्या बियाण्यांचा तुटवडा असल्याने कांदा बियाण्याचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना एका किलोसाठी चार, पाच हजार रुपये मोजावे लागत आहे. रोपे दोन महिन्यांनी उशिरा लावणीस येणार असल्याने कांदा लागवडी देखील उशिरा होणार आहे. कांदा उत्पादनाचा खर्च यंदा एकरी दीड ते दोन लाख होणार असल्याने तोटा होण्याची शक्‍यता शेतकरी हनुमंत गाडे, काशिनाथ बोत्रे यांनी व्यक्त केली आहे.

फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत

परदेशी कांद्यापेक्षा देशी कांद्याला भाव
कांदा निर्यात बंदी नंतर केंद्र सरकारने कांदा आयातीला चालना दिली. इराण, इराक, इजिप्त, अफगाणिस्तानचा कांदा सध्या देशात आयात होऊ लागला आहे. त्या कांद्याला प्रति किलोला 40 ते 45 रुपये भाव मिळत असून देशी कांदा 60 ते 65 रुपये किलो दराने विकला जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price of seeds is four to five thousand per kg