येरवडा कारागृहातून पळालेल्या कैद्याची झेप पिंपरीपर्यंतच; सापडला पोलिसांच्या जाळ्यात

prisoner ran away from yerwada jail arrested police pimpri chinchwad
prisoner ran away from yerwada jail arrested police pimpri chinchwad
Updated on

पिंपरी : येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून दोन कैदी शनिवारी (ता.13) पहाटे पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने सायंकाळी जेरबंद केले.

पिंपरीच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हर्षद हानिफ सय्यद (वय 20) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. हर्षद व आकाश बाबूलाल पवार (वय 24) हे दोघेजण शनिवारी कारागृहातून पसार झाले. आकाश पवार याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तर हर्षद याच्यावर खडकी पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात मुलींच्या वसतिगृहात तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी नवीन कैद्यांना ठेवण्यात येत आहे. तेथेच दोघांना येथे ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोघेही तेथून पसार झाले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील हर्षद हा पिंपरी चिंचवडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले.

दुसऱ्यांदा पळून गेला
शनिवारी सय्यद याच्यासोबत पसार झालेल्या आकाश पवार या आरोपीने पंधरा दिवसापूर्वीही पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात वाकड पोलिसांनी आकाश बाबुराव पवार (वय 21), गणेश उर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय 19, दोघेही रा. नढेनगर, काळेवाडी ) याच्यासह कृष्णा उत्तम सोनवणे (वय 19 रा. तापकीर मळा, काळेवाडी) यांना वैद्यकीय तपासणीसाठी 26 मे रोजी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणले होते. त्यावेळी 
सोनवणे हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. तर आकाश पवार व गणेश कांबळे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

असा अडकला जाळ्यात
सय्यद हा पिंपळे सौदागर येथील पवनामाई स्मशानभूमी येथे कोणाची तरी वाट पाहत थांबल्याची माहिती शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस नाईक आशिष बोटके व किरण काटकर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर,  हवालदार अजय भोसले, महेश खांडे, अशोक दुधवणे, आशिष बोटके, किरण काटकर, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता येरवडा कारागृहातून पसार झाल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर त्याला येरवडा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. सय्यद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर भोसरी, येरवडा, वाकड, खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com