esakal | ‘पीएमपी’ला हवेत १३९८ कोटी रुपये;दोन्ही महापालिकांच्या स्थायी समितीला प्रस्ताव 
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमपी’ला हवेत १३९८ कोटी रुपये;दोन्ही महापालिकांच्या स्थायी समितीला प्रस्ताव 

पिंपरी चिंचवड महापालिकांनी त्यांच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात अनुक्रमे ८३२ कोटी १२ लाख आणि ५६५ कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद करावी, अशी विनंती पीएमपीने दोन्ही महापालिकांचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आयुक्तांना केली आहे.

‘पीएमपी’ला हवेत १३९८ कोटी रुपये;दोन्ही महापालिकांच्या स्थायी समितीला प्रस्ताव 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी पीएमपीचा दैनंदिन कारभार सुरळीत राहावा, यासाठी येत्या आर्थिक वर्षांत पीएमपीला १३९८ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी त्यांच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात अनुक्रमे ८३२ कोटी १२ लाख आणि ५६५ कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद करावी, अशी विनंती पीएमपीने दोन्ही महापालिकांचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आयुक्तांना केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीच्या दहा हजार कर्मचाऱ्यांना सातवा  वेतन आयोग लागू करून  फरकाची ४५ महिन्यांची रक्कम देण्यासाठी त्यातील ३२५ कोटींचा समावेश आहे.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेत नुकताच विकास कामांचा आढावा बैठक घेतली. त्यात दोन्ही शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी पीएमपीला मदत करावी, असे सांगितले आहे. तसेच पीएमपीच्या ताफ्यात १५०० ई - बस येत नाही, तोपर्यंत भाडेवाढ करू नका, अशी सूचनाही केली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करावा लागणार आहे. त्याच्या फरकाची रक्कम एक एप्रिल २०१७ पासून द्यायची आहे. त्यासाठी पीएमपीचा वेतनावरील खर्च दरमहा सुमारे सव्वा आठ कोटी रुपयांनी वाढणार आहे. वेतन आयोग करण्यासाठी फरकाची रक्कम देण्यासाठी पीएमपीला एकूण ४२७ कोटी १० लाख रुपये लागणार आहेत. ही रक्कम दोन्ही महापालिकांनी अनुक्रमे २५६ कोटी ३२ लाख  आणि १७० कोटी ८८ लाख या प्रमाणात द्यावी, असे पीएमपीने सुचविले आहे. 

राजगडावर दुर्घटना; मुंबईहून आलेल्या ट्रेकरचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू​

पीएमपी ही कामे करणार
 पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात  वाहतूक सुरू करणार 
५०० ई-बस सेवेत येणार 
दोन्ही शहरांतील एकूण ९  आगारांचे विकसन होणार 
 बीआरटीचे नवे मार्ग सुरू होणार 
 पुणे, पिंपरी चिंचवड दर्शन बस  नव्या स्वरूपात 

पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'!