esakal | पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'!
sakal

बोलून बातमी शोधा

Highway

उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या वाहतुकीमुळे मुंबई ते पुणे, पुणे ते सोलापूर आणि पुणे ते कोल्हापूर अशी वाहतूक मोठी आहे.

पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'!

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

वारजे माळवाडी (पुणे) : पुणे-शिरुर-नगर महामार्गावरील पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी 'नागपूर पॅटर्न'प्रमाणे दोन मजली उड्डाणपुल बांधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामध्ये वाघोली ते शिरूर दरम्यान ४८ किलोमीटरचा दुमजली पूल उभारण्यात येणार असल्यामुळे येथे १६ पदरी रस्ता असणार आहे. 

येथील वाहतूक कोंडीबाबत अनेक तक्रारी होत्या. रस्त्यावरील वाहनांची संख्या दररोज वाढणार आहे. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर दोन मजली उड्डाणपूल करायला सांगितले होते, असा उड्डाणपूल नागपूर येथे केला असून तो आता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. 

महत्त्वाची बातमी : पुण्यातील कॉलेजांचे गेट सोमवारी उघडणार!​

सध्याचा असणारा रस्ता सहा पदरी असेल. त्याच्यावरील उड्डाणपूल जिल्ह्यातील वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा शिक्रापूर, रांजणगाव असे खाली उतरून वर चढणेसाठी रस्ते असणारा चार पदरी असेल. तर त्याच्यावर असलेला दुसऱ्या मजल्यावर सहा पदरी रस्ता थेट नगरला जाणाऱ्यांसाठी शिरूरपर्यंत उड्डाणपूल असेल. यामुळे एक तास वाचणार आहे. त्याचवेळी पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अॅक्सेस रोड होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केली आहे.

व्हॅलेन्टाईन स्पेशल : अजून 96 नाही पाहिला? काय राव!​

या १६ पदरी रस्त्याच्या दोन मजली उड्डाणपूलाचे सादरीकरण राष्ट्रीय महामार्गाचे सचिव विनय देशपांडे, अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी केले. नागपूरच्या धर्तीवर दोन मजली उड्डाण पूल बांधणार आहे. त्यासाठी सहा हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. पहिल्या मजल्यावर रस्त्यावर ये-जा करण्यासाठी आठ ठिकाणी रस्ता असणार आहे. तर क्रशर फाटा येथे अंडरपास असणार आहे. या उड्डाणपूलाचे काम तीन वर्षे सुरू राहणार आहे.

राजगडावर दुर्घटना; मुंबईहून आलेल्या ट्रेकरचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू​

उत्तर आणि दक्षिण भारत जोडणारा नवीन महामार्ग
उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या वाहतुकीमुळे मुंबई ते पुणे, पुणे ते सोलापूर आणि पुणे ते कोल्हापूर अशी वाहतूक मोठी आहे. त्याच सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात या राज्यातून थेट दक्षिणेतील हैदराबाद, बेंगलोर, त्रिवेंद्रम आणि चेन्नई अशा चार दिशांना जाणारी वाहतूक खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही मुंबई ते दिल्ली असा हा बारा पदरीचा महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई-दिल्लीपर्यंत अंतर १२-१३ तासांत कापता येईल. तसेच सुरतपासून नाशिक, नगर सोलापूरमार्गे नवा महामार्ग करणार आहे. पुणे, मुंबई, नगर, नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image