पिंपरी : मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा आपतर्फे निषेध 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

आम आदमी पक्षाच्या (आप) वतीने मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा गुरवारी (ता. 24) निषेध नोंदविण्यात आला.

पिंपरी : आम आदमी पक्षाच्या (आप) वतीने मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा गुरवारी (ता. 24) निषेध नोंदविण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीतील आंबेडकर पुतळा चौकात काळ्या फिती लावून भाजप सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. 

पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

शेतकारी कायदा हा बाजार संपवणारा आहे. बाजार राहिला नाही, तर मोठे भांडवलदार शेतकऱ्यांची पिळवणूक करतील. सर्वांना भिकेला लावतील, असे आपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा म्हणाले. हा कायदा छोट्या किरकोळ विक्रेत्यांसाठी घातक आहे. उद्या एपीएमसी घाऊक बाजारच राहिला नाही, तर छोट्या विक्रेत्यांना मोठ्या भांडवलदारांचे गोडाऊन घ्यावे लागेल. त्यामुळे छोट्या दुकानदारांना दुजाभावाची वागणूक मिळणार आहे. छोट्या विक्रेत्यांनी शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून या बिलाला विरोध करावा, असे मत आपचे प्रवक्ते कपिल मोरे यांनी निवेदनातून मांडले. 

भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

आपचे राघवेंद्र राय, स्वप्नील जेवले, राजेंद्र काळभोर, स्मिता पवार, वहाब शेख, सागर सोनवणे, सरफराज मुल्ला, नंदू नारंग पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest against modi government's anti-farmer policy in pimpri chinchwad