
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुद्रांक महानिरीक्षकपदी शुक्रवारी बदली झाली.
पिंपरी : महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुद्रांक महानिरीक्षकपदी शुक्रवारी बदली झाली. त्यांच्या जागी ओडिशा प्रशासकीय सेवेतील राजेश पाटील यांची नियुक्ती झाली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
प्रशासकीय सेवेची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना एक जानेवारी रोजी सचिवपदी पदोन्नती मिळाली. त्याच वेळी त्यांची बदलीही अपेक्षित होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. मात्र, कोरोना व लॉकडाउनमुळे मुदतवाढ मिळाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. अखेर आज बदलीचा आदेश निघाला. त्यांच्या जागी आयुक्तपदी आलेले पाटील सोमवारी (ता. 15) पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
2005 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. ओडिशा प्रशासकीय सेवेत आणि केंद्र सरकारच्या स्कील इंडिया उपक्रमातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सुरुवातीला त्यांची स्टॅटेस्टिकल सर्व्हिसमध्ये निवड झाली होती. पण, आयएएस अधिकारीच व्हायचे, अशी त्यांची इच्छा होती आणि 2005 च्या युपीएससी परीक्षेत त्यांनी बाजी मारली. कोटापूरमधील अठगढ इथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.