कोरोनाच्या सावटातही पिंपरी-चिंचवडमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह

कोरोनाच्या सावटातही पिंपरी-चिंचवडमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह

पिंपरी : घरोघरी बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. कोरोना संसर्गात अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या बहीण-भावांच्या मात्र, भेटीगाठी झाल्या नाहीत. सोशल मीडियावरुनच शुभेच्छा व व्हिडीओ कॉलद्वारेच सण साजरा झाला. दरवर्षी सणासाठी मुबलक प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या एसटी व बस सेवा सुरु नसल्याने व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी बंदी असल्याने बऱ्याच बहीण-भावांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही नात्यातील वीण अधिक घट्ट झाली.

दरवर्षी वल्लभनगर आगार तीन दिवसांपासूनच गजबजलेले असते. बहिणींची भाऊरायाच्या ओढीने सणासाठी लगबग असते. आगाऊ बुकींग झालेले असते. पीएमपीकडूनही जादा बस देण्यात येतात. मात्र, यंदा बस व एसटी जागेवरच उभ्या होत्या. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या गाड्यांच्या माध्यमातून मिळते. चालक व वाहकांच्या सुट्याही रद्द केल्या जातात. त्यामुळे राखी सणाचा सार्वजनिक वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षीच्या तुलनेत राख्यांचा खपही यंदा 35 ते 40 टक्के झाला. स्टॉलला परवानगी नसल्याने होलसेल विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. चार ते पाच जिल्ह्यांमध्ये अद्यापही लॉकडाउन असल्याने होलसेल व्यापाऱ्यांना राख्या पाठविता आल्या नाहीत. पिंपरी बाजारपेठेत सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू असल्याने राख्यांची विक्री अल्प प्रमाणात झाली. शाळा व महाविद्यालये देखील बंद असल्याने पालकांनी संसर्गाच्या भीतीने घरातच सुटी घालवली. त्यामुळे एकूणच या सणावरही कोरोनाचे सावट दिसले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घरातच गोडधोड बनवून सकाळीच बहीण-भावांनी राखीचा सण साजरा केला. सेल्फि क्‍लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले. काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जमिनी किंवा घरगुती वादातून भावा-बहिणींच्या ताटातूटी झाल्या. त्यांनाही नात्यामधल्या दुराव्यामुळे नकळत आठवणी झाल्या. बऱ्याच जणांच्या घरातच कोविड रुग्ण असल्याने त्यांना घराबाहेर पडता आले नाही. त्यांनी घरातच पूर्ण दिवस व्यतीत केला.

पीएमपीने गतवर्षी राखी सणाला सोडल्या एवढ्या बस

  • बस - 1500
  • अतिरिक्त - 300
  • उत्पन्न - 1 कोटी 75 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com