रास्त धान्य दुकानदारांकडून धान्याचे वितरण 1 फेब्रुवारीपासून बंद होणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

नागरिकांकडून शिधापत्रिकेतील काळा बाजार थांबविण्यासाठी सीडिंग होणे गरजेचे आहे. अन्यथा, थेट रास्त धान्य दुकानदारांकडून धान्याचे वितरण 1 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे.

पिंपरी - शिधापत्रिकेसोबत आधारकार्ड सीडिंग (लिंक) करण्याचे काम निगडी परिमंडळ "अ' व "ज' कार्यालयीन स्तरावर सुरु आहे. शिधापत्रिका कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले जात आहे. नागरिकांकडून शिधापत्रिकेतील काळा बाजार थांबविण्यासाठी सीडिंग होणे गरजेचे आहे. अन्यथा, थेट रास्त धान्य दुकानदारांकडून धान्याचे वितरण 1 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. मात्र, केवळ 35 हजार शिधापत्रिकाधारकांनी आतापर्यंत आधारकार्ड लिंक केले आहे. त्यामुळे धान्यवितरण बंद झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील नद्या कोट्यवधी खर्चूनही प्रदूषितच

शहरात सध्या आधारकार्ड ऑनलाइन लिंक करण्याचे काम सुरु आहे. 31 जानेवारीला सीडिंग करण्याची मुदत संपत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व राष्ट्रीय अंत्योदय योजनेचा लाभ या माध्यमातून मिळत आहे. केवळ कार्डधारकांची डेटा एंट्री होणे म्हत्वाचे आहे. थोडक्‍यात नागरीकांची केवायसी केली जात आहे. यामुळे शिधा पत्रिकेवरील दुबार नोंदणी, मयत व्यक्ती, बोगस शिधापत्रिका, स्थलांतरीत कार्डधारक वगळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शिधा वाटपामध्ये पारदर्शकता येणार आहे. सर्वसामान्य नागरीकांची फसवणूक टळेल. शिवाय कोणीही एजंटगिरी व धान्यात काळाबाजार करू शकणार नाही. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार लिंक होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा वैध मोबाईल क्रमांकच असणे अत्यावश्‍यक आहे. 

पिंपरी-चिंचवड : धन्वंतरीवरून राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने

प्रत्येकी शिधा धारकाला मिळते 
गहू - 3 किलो 
तांदूळ - 2 किलो 
साखर - 1 किलो 

नेमके काय घडतेय 
पिवळे व केशरी शिधापत्रिका कार्डधारक धान्य मागण्यासाठी गेले असताना सीडिंगच्या प्रक्रियेसाठी धजावत नाही. नागरीकांकडून टाळाटाळ केली जात आहेत. 'पुढच्या महिन्यात लिंक करू' असे एकच उत्तर नागरीकांकडून मिळत आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी तोबा गर्दी होण्याची शक्‍यता आहे. 

सातारा जिल्ह्यातील पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भाव

आकडे बोलतात 
सीडिंग केलेले धारक - 35821 
'अ' विभाग शिधाकार्ड धारक - 1,60,58 
'ज' विभाग शिधाकार्ड धारक - 1,54,849 
केशरी व पिवळे एकूण कार्ड धारक - 3,15,483 

सध्या नागरिकांची आधार नोंदणी तुलनेत कमी झाली आहे. नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. धान्य बंद झाल्यास पुन्हा गोंधळ वाढेल. त्यासाठी नागरीकांनी त्वरीत आधार लिंक करणे गरजेचे आहे. त्यासाठी जवळच्या रास्त धान्य दुकानात संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. 
- दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी अ विभाग, पिंपरी-चिंचवड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ration shop Grain distribution will be closed from 1 February