esakal | पिंपरी-चिंचवड : धन्वंतरीवरून राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून विमा सुरू केली आहे. त्यामुळे मध्यस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात गैरवापर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला. मात्र, हा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी फेटाळून लागला.

पिंपरी-चिंचवड : धन्वंतरीवरून राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिका कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून विमा सुरू केली आहे. त्यामुळे मध्यस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात गैरवापर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला. मात्र, हा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी फेटाळून लागला. विमा योजना कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या हिताची असून धन्वंतरी योजनेप्रमाणेच "विमा'चा लाभ मिळणार आहे. शिवाय, महापालिकेच्या सेवेतील विद्यमान शिक्षकांसह निवृत्त शिक्षकांच्या कुटुंबीयांनाही लाभ होणार असल्याचा दावा केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दहा वर्षांपासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू होती. मात्र, ती बंद करून विमा योजना लागू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यास गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या योजनेस महापालिका कर्मचारी महासंघाचा विरोध असून, त्यासंदर्भात ते न्यायालयात गेले आहेत. त्यांना राष्ट्रवादी व शिवसेनेचाही पाठिंबा आहे. याबाबत बहल म्हणाले, 'सत्ताधारी भाजप चुकीच्या पद्धतीने सभागृह चालवत आहे. विरोधकांना बोलू दिले जात नाही. कामगारांना नको असलेली विमा योजना माथी मारली जात आहे. महापालिकेचा दुप्पट खर्च होणार आहे. विमा रकमेच्या कमिशनपोटी मोठी रक्कम संबंधित नेत्यांना मिळाली असल्यामुळे विमा योजना रेटून नेली जात आहे.'' 

देशातील स्मार्ट सिटी रॅंकिंगमध्ये पिंपरी चिंचवड उद्योगनगरीला 41 वा क्रमांक

महापालिका कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी लागू केलेल्या विमा योजनेतून किती पैसे वाचणार आहेत. जवळपाच नऊ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा तिजोरीवर पडणार आहे. यामध्ये तत्कालीन पक्षनेते, स्थायी समिती सभापती व त्यांचे एक नेते सहभागी आहेत. त्यांच्या दबावाखाली आयुक्त काम करीत आहेत. विमा योजनेविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. 
- योगेश बहल, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पुणे महापालिका काठावर पास 

सभागृहात एक व बाहेर एक अशी माझी भूमिका नसते. ज्या योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे, त्यासाठी पाणीपुरवठा योजनेसाठीच्या निधीतील 21 कोटी रुपये वर्ग केले आहेत. हे चुकीचे आहे. यात भामा-आसखेड प्रकल्पांतर्गथ पाच कोटी, चिखली-मोशीतील जलवाहिन्या व टाक्‍यांसाठीचे सहा कोटी, वाकड, थेरगाव, किवळे, पुनावळे, ताथवडेतील पाणी योजनेतील दहा कोटी रुपयांचा समावेश आहे. 
- राहुल कलाटे, गटनेते, शिवसेना 

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर;आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसासह मद्यधुंद वाहनचालक निलंबित

कर्मचारी स्वास्थ्य विमा योजनेसाठी निधी वर्गीकरणाचा विषय आजच्या सभेसमोर होता. या योजनेस 2019 मध्येच सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली आहे. महासंघाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे. धन्वंतरी योजनेप्रमाणेच विमा योजनेतून लाभ मिळणार आहेत. आजी व सेवानिवृत्त दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या कुटुंबांना लाभ मिळणार आहे. धन्वंतरी योजनेत मोजकेचे रुग्णालये होती. विमा योजनेत देशातील सात हजार रुग्णालयांचा समावेश आहे. 
- नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते, भाजप

Edited By - Prashant Patil

loading image