रावण टोळीच्या म्होरक्‍याला आकुर्डीत पिस्तूलासह अटक 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

विकी उर्फ अनिरूद्ध राजू जाधव (वय 24), मन्या उर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय 22, दोघेही रा. जाधववस्ती, रावेत) अशी आरोपींची नावे आहेत. आकुर्डीतील तहसील कार्यालयाकडून गुरूद्वारा चौकाकडे रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याजवळ दोघेजण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

पिंपरी : दरोड्याच्या गुन्ह्यात अनेक दिवसांपासून फरारी असलेला रावण टोळीचा म्होरक्‍या व त्याच्या साथीदाराला पिस्तुलासह जेरबंद करण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. ही कारवाई आकुर्डी, रेल्वे स्थानकाजवळ करण्यात आली. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

विकी उर्फ अनिरूद्ध राजू जाधव (वय 24), मन्या उर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय 22, दोघेही रा. जाधववस्ती, रावेत) अशी आरोपींची नावे आहेत. आकुर्डीतील तहसील कार्यालयाकडून गुरूद्वारा चौकाकडे रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याजवळ दोघेजण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता विकी याच्या कमरेला एक पिस्तूल तर मन्या याच्याकडे दोन जिवंत काडतुसे आढळली. त्यांच्याकडून 35 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravan gang leader arrested with pistol in Akurdi

Tags
टॉपिकस
Topic Tags: