रावेतमध्ये भरधाव ट्रकने कामगारांना उडवले; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

रस्त्यावर सफेद पट्ट्या मारण्याच्या काम करणाऱ्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने उडवले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून चौघे जखमी आहेत.
Accident
AccidentSakal
Summary

रस्त्यावर सफेद पट्ट्या मारण्याच्या काम करणाऱ्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने उडवले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून चौघे जखमी आहेत.

पिंपरी - रस्त्यावर सफेद पट्ट्या मारण्याच्या काम करणाऱ्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने उडवले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून चौघे जखमी आहेत. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत येथे घडली.

सादिक हुसेन खान (वय ३५, रा. राजस्थान) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर भोला कुमार, अनिल कुमार, प्रल्हाद यादव (सर्व रा. राजस्थान), संदीप देशमुख (रा. नांदेड) हे जखमी आहेत. हे सर्व जण एका कंपनीत कंत्राटी कामगार असून ते सोमवारी (ता. ३०) पहाटे साडे तीनच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर पट्ट्या मारण्याचे काम करीत होते. देशमुख हे सुपरवायजर आहेत.

दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काम सुरु असताना भरधाव ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये सादिक यांचा मृत्यू झाला. तर, चौघे जखमी झाले. यातील देशमुख हे गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com