
रावेत : सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सुलभ व्हावी, यासाठी तयार करण्यात येणारा मुकाई चौक ते निगडी बीआरटी मार्ग रखडला आहे. त्यामुळे पीएमपी बससेवा विस्कळित होत असून बसना बीआरटी मार्गाऐवजी मुख्य रस्त्यावरून जावे लागत आहे. त्याने कोंडीत भर पडत आहे. यामुळे अन्य वाहनचानक त्रस्त झाले आहेत.