शाळांतून वाचन संस्कृती व्यापक आणि समृद्ध व्हावी - सुनिल चांदेरे

बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी दिली पुस्तकरूपी गुरुदक्षिणा
Reading culture should widespread and enriched in schools Sunil Chandere wakad
Reading culture should widespread and enriched in schools Sunil Chandere wakadsakal

वाकड : आजच्या संगणक, इंटरनेट व मोबाईलच्या आधुनिक जगात शालेय वयातच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून लोक चळवळीद्वारे शाळांतून वाचन संस्कृती अधिक व्यापक आणि समृध्द करावी या ज्ञान गंगेतून देशाला असंख्य आणि गुणवंत सनदी अधिकारी लाभतील असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांनी हिंजवडीत केले. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील व चांदेरे यांच्या शालेय गुरूंच्या नावे असलेल्या कै. हनुमंत साखरे गुरुजी वाचनालयातील पुस्तकांसाठी पिडीसीसी बँकेच्या सीएसआर निधीतून पन्नास हजार रुपये मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक बाप्पू येळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जि. पच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, आयटीनगरीचे सरपंच मच्छिंद्र हुलावळे, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सागर साखरे, दिलीप हुलावळे, संभाजी हुलावळे, यशवंत साखरे, शिवनाथ जांभुळकर, गणपत जगताप, कपिल बुचडे, ऋषिकेश साखरे, राजेंद्र साखरे, संतोष साखरे व सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. चांदेरे पुढे म्हणाले, आपल्या गुरूच्या ऋणातून उतराई होण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच गुरुंचे विचार पुढच्या पिढीत व समजात पोहचविणे होय. कार्यक्रमांमध्ये बुके ऐवजी बुकं भेट दिली पाहिजे. देणाऱ्याने किती दिले यापेक्षा कुठल्या भावनेने दिले हे महत्वाचे आहे. प्रास्ताविकात रामदास पायगुडे म्हणाले वाचन संस्कृती वाढवून जगासमोर आदर्श मुळशी पॅटर्न उभा करू. ज्योती दवणे यांनी सुत्रसंचालन केले. मनिषा हुलावळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com