पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहितेच्या छळाच्या घटना वाढल्या; एकाच दिवशी तीन गुन्ह्यांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

एकाच दिवसांत वाकड व चिखली पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांवरून विवाहितेच्या छळाच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

पिंपरी : माहेराहून पैसे, कार आणण्यासह लग्नात वस्तू न दिल्याच्या कारणांसह इतर कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. एकाच दिवसांत वाकड व चिखली पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांवरून विवाहितेच्या छळाच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकडमधील पहिल्या घटनेप्रकरणी पती संदीप शिवाजीराव सारोळकर, सासू मीना सारोळकर, दीर शिरीष सारोळकर, नणंद स्वाती संजय गाडे, नणंदावा संजय गाडे (सर्व रा. प्रिस्टीन प्रो लाईफ फेज क्रमांक 1, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. लग्नात काहीही न दिल्याने आरोपींनी फिर्यादीकडे मोटारीची मागणी केली असता, कार न दिल्याने आरोपींनी फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच डायनिंग टेबल, ए. सी. इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन, टीव्ही व मोटार दिली नाही, तर आम्ही मुलाचे दुसऱ्या मुलीशी लग्न करून देऊ, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीकडील सोन्याचे सर्व दागिने काढून घेत त्यांना बेदम मारहाण केली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास याच फ्लॅटवर जिवंत मारून टाकू, अशी धमकीही दिली. 

'जेलमधून बाहेर आल्यावर मी तुझी गेम करीन', वाहतूक पोलिसालाच दिली धमकी

दुसरी घटना चिखली येथे घडली. यामध्ये पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती सूरज गणपत जाधव (वय 27), सासू रेखा जाधव (वय 48), सासरा गणपत चिमाजी जाधव (वय 48), जाऊ अश्विनी स्वप्निल जाधव (वय 24, सर्व रा. सचिन हाउसिंग सोसायटी, कृष्णानगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. "तू नोकरी करून पैसे घेऊन ये, नाहीतर तुझ्या वडिलांकडून पैसे व वानवळा घेऊन ये, तरच आमच्या घरात रहा,'' असे म्हणत विवाहितेला त्रास दिला. शिवीगाळ करीत मानसिक व शारीरिक छळ केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिसऱ्या घटनेत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार विराज शैलेश मोरे (वय 31), सासरा शैलेश कीर्तीवान मोरे, सासू उज्वला शैलेश मोरे (सर्व रा. सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी वारंवार वेगवेगळ्या कारणावरून शिवीगाळ करीत फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. वाकड पोलिस तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recorded three offenses of marital harassment case at pimpri chinchwad