पीठासन अधिकाऱ्यांच्या मानदंडाचा अडथळा हटवा; विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची मागणी  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मासिक सर्वसाधारण सभा होते. सभेच्या पीठासन अधिकाऱ्यांच्या अर्थात महापौरांच्या आसनासमोर प्रथेप्रमाणे मानदंड ठेवला जातो.

पिंपरी : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मासिक सर्वसाधारण सभा होते. सभेच्या पीठासन अधिकाऱ्यांच्या अर्थात महापौरांच्या आसनासमोर प्रथेप्रमाणे मानदंड ठेवला जातो. त्याच्याजवळ कोणी पोचू नये, यासाठी दहा महिन्यांपूर्वी फर्निचरचे अडथळे उभारले. ते काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली आहे. 

पिंपरी-चिंचवडकर म्हणतायेत, 'पाणी ओसरलं, पण दुर्गंधीचं काय?' 

महापालिकेच्या सभा कामकाजात एखादा मुद्दा न पटल्यास किंवा एखाद्या विषयाला विरोध असताना तो मंजूर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाल्यास विरोधक आक्रमक होऊन मानदंडापर्यंत किंवा पीठासन अधिकाऱ्यांच्या हौदापर्यंत जातात. अनेकदा मानदंड पळवून नेला जातो. तसे होऊ, नये यासाठी अडथळे उभारले आहेत. याबाबत मिसाळ यांनी निवेदनात म्हटले आहे, की लोकशाही परंपरेत विरोधकांनाही हक्काचे स्थान आहे. सभेमध्ये स्फोटक वातावरण निर्माण झाल्यास आणि मानदंड उचलला गेल्यास वातावरण शांत करणे, असा संकेत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु, काही दिवसांपासून सभागृहात पीठासन अधिकाऱ्यांच्या आसनासमोरील मानदंडासमोर सत्ताधारी पक्षाने जाणूनबुजून अडथळा निर्माण केला आहे. जेणेकरून विरोधकांना मानदंडापर्यंत जाता येणार नाही. वस्तुतः: नवीन सभागृह अस्तित्वात आले, तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. राष्ट्रवादीने विरोधकांना कायम आदराची वागणूक दिलेली आहे. मानदंडासमोर अडथळा निर्माण करून विरोधकांच्या हक्कावर गदा आणली आहे. अडथळा काढून न टाकल्यास महापौर कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove the barrier to the norms of presiding officers demands by Opposition leader Raju Misal