सततच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे मोशीतील सोसायटीतील रहिवासी त्रस्त

श्रावण जाधव
Saturday, 17 October 2020

सततच्या वीज खंडित होण्यामुळे पर्यायी वीज पुरवठा उभारण्यासाठी एकीकडे पैसा खर्च करावा लागत आहे तर दुसरीकडे नोकरदारांना वर्क फ्रॉम होम करण्यात अनेक अडथळे येत असून परिणामी नोकरीवर गदा येण्याची भिती वाटत आहे.​

मोशी(पिंपरी) : सलग 20 ते 25  तास वीज नसल्याने सोसायटीतील सदनिकाधारकांना वीजेसह मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. सततच्या वीज खंडित होण्यामुळे पर्यायी वीज पुरवठा उभारण्यासाठी एकीकडे पैसा खर्च करावा लागत आहे तर दुसरीकडे नोकरदारांना वर्क फ्रॉम होम करण्यात अनेक अडथळे येत असून परिणामी नोकरीवर गदा येण्याची भिती वाटत आहे.

पर्यायी वीजपुरवठ्यांमुळे सोसाट्यांना आर्थिक भुर्दंड
सोसायटीतील सदनिकांसमोरील भाग, जीना व पार्किंग अशा सामुदायिक वापर असलेल्या ठिकाणी वीज नसल्याने येथील वीज अत्यावश्यक असल्याने त्यासाठी 30 ते 35 हजार रुपयांचे डिझेल लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्क फ्रॉम होम होईना, नोकरीवर गदा येणाची भिती
व​सततच्या वीज खंडित होण्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या बहुसंख्य नोकरदार ऑनलाइन काम करणे अशक्य होत असून दिलेले काम वेळेत न झाल्याने कंपनीकडून त्यांना समज मिळत आहे. त्यामुळे कंपनीकडून काही कारवाई होईल काय? अशा भितीच्या सावटाखाली त्यांना रहावे लागत आहे. 

ऑनलाईन शिक्षणाचे वाजले बारा
वीजच नसल्याने परिणामी इंटरनेट सेवा बंद पडत असून व मोबाईल लॅपटॉप चार्जिंग करणे शक्य नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. अशा विविध अडचणींचा सामना मोशीतील स्वराज गृहनिर्माण सोसायटी मधील सुमारे 622 सदनिकाधारक  करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीज खंडीत होण्याची कारणे... 

  • वीज जोडणी : शेजारील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीमधून. 
  • वीज जोड : जमिनी खाली फक्त 2 फूटावर. 
  • सिमेंट किंवा पीव्हीसी पाइप मधून नसल्याने रस्त्याचे कामाप्रसंगी केबल वारंवार तुटणे.
  • नादुरुस्त झालेली केबल दुरुस्तीसाठी वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेळ लावणे. 
  • दुरुस्त होऊन वीजप्रवाह पूर्ववत होण्यासाठी 15 ते 20 तास कालावधी घेणे.
  • हे असे गेल्या दोन वर्षभरात 7 ते 8 वेळा झाले आहे.
  • सोसायटी मार्फत, महावितरण आकुर्डी कार्यालयाला लेखी पत्र दिले आहे.
  • वेळोवेळी संबधित अधिकारी व कर्मचारी यांना विनंती केल्यावर हे काम केले जाते.

मावळात आज ४७ पॉझिटिव्ह अन् ४७ जणांना डिस्चार्ज   

मोशीतील स्वराज गृहनिर्माण सोसायट्यांमधील हा वारंवार वीज पुरवठा खंडित होणारा प्रश्न संबंधितांनी कायमचा सोडवावा अन्यथा चिखली मोशी गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा येथील सदनिकाधारक बाळाप्पा माने, गिरीश उधाने, अमित धर्मातले, श्री महेश नेवाले, एकनाथ कुरणे, स्वप्नील पाटील, ज्ञानेश्वर घाडगे, हुले, प्रवीण हुले, निलेश आंबेडकर, धम्मापल मस्के, भिवाजी काळे, गणेश मांडे, संतोष बिरादार, मीनल धर्मातले आदींनी केली आहे.

''दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे व इतर वेळीही विविध कारणांनी येथील फिडर बंद पडतो. त्याचे काम करण्यास तेवढा वेळ लागतोच. येथील रस्त्यांची वारंवार होणारी खोदाई यामुळेही केबल तुटून वीज पुरवठा खंडीत होतो.''
- माऊली नाईक, महावितरण तंत्रज्ञ, मोशी विभाग.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांचा 85 हजारांचा आकडा पार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Residents of Moshi Society suffer due to uninterrupted power supply