वडगाव मावळ : 'आरपीआय'तर्फे मुंबईच्या घटनेचा निषेध     

वडगाव मावळ : 'आरपीआय'तर्फे मुंबईच्या घटनेचा निषेध     

वडगाव मावळ (पुणे) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी (ता. 11) रमाबाई आंबेडकरनगर, घाटकोपर, मुंबई येथील कृत्याविरोधात व महाराष्ट्रात होणाऱ्या दलित अत्याचाराविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पक्षाचे  पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना निवेदन देण्यात आले. त्यात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास कायमस्वरूपी संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड,  मावळ महासचिव अशोक सरवते, कार्याध्यक्ष  दिलीप दामोधरे, महिला आघाडी अध्यक्षा भावना ओव्हाळ, आरटीआय कार्यकर्ते अनिल भांगरे, कमलशील म्हस्के, सरपंच नागेश ओव्हाळ,  गौतम गायकवाड,  सुनिल पवार, संतोष सोनवणे, अभिजित सोनवणे, विजय जाधव, दादू भालेराव, सुभाष ओव्हाळ, अनिल गायकवाड, श्याम साळवे, अजय भवार, अनिल ओव्हाळ, गोरख साळवे, सचिन साळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com