Video : आरटीओ अधिकाऱ्यांमुळे माणुसकी दाखवली, पण तीच अंगलट आली...

Video : आरटीओ अधिकाऱ्यांमुळे माणुसकी दाखवली, पण तीच अंगलट आली...

पिंपरी : माणुसकी दाखविल्यामुळे दंड भरायची वेळ आमच्यावर आली. आरटीओ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच परप्रांतीय मजुरांना सोडले अन्‌ आमची वाहने जप्त केली. तुम्हीच सांगा, वाहने जप्त केल्यावर आम्ही 80 हजाराचा हप्ता कसा भरायचा कसा, रोख दंड भरायला आलोय, तर आरटीओ अधिकारी दंड भरून घेईनात. एक जूनला पाहू, अशी उत्तरे देताहेत. पंधरा दिवस गाडी जप्त राहिल्यावर आम्ही खायचं काय, गुजराण कशी करायची, अशी व्यथा वैतागलेले ट्रकमालक व चालकांनी मांडली. वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यांच्या वाहनांवर कारवाई केली आहे. सोमवारी (ता. 18) सकाळपासून जप्त वाहने सोडवून घेण्यासाठी ते ताटकळत उभे होते. परंतु, एकाही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतली नाही.

टाळेबंदीमुळे मजूर स्थलांतरासाठी मालवाहतूक वाहनांमधून अवैध आणि धोकादायकपणे प्रवास करत आहेत. अशा प्रकारे अवैध जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक वाहनांवर आरटीओने शनिवारी (ता. 16) कारवाई केली आहे. त्यात ट्रक, टेम्पो, कंटेनर, 14 टायर गाड्या, 16, 13 एलपी, आयशर यांच्यासह अन्य छोट्या-मोठ्या अशी दहा वाहने पकडली आहेत. या कारवाईमध्ये काही माणुसकी दाखविणारे वाहनचालक आणि मालक भरडले गेले आहेत. आज कार्यालय सुरू झाल्यामुळे जुन्नर, मंचर, उत्तर प्रदेश, अहमदाबादवरून आलेली ही मंडळी सकाळपासून उन्हातान्हात आरटीओच्या प्रवेशद्वाराबाहेर बसून होते. पण कर्मचारी नसल्याचे कारणे देत त्यांची समस्या कोणी जाणून घेतली नाही.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहनचालक दत्ता निगुट यांनी सांगितले, "मोशी टोलनाक्‍यावर आरटीओच्या काही अधिकाऱ्यांनी मजुरांना संगमनेर आळेफाटापर्यंत सोडवून देण्यास सांगितले. आमच्या गाडीत पॅसेंजर बसले, त्यांच्याकडून एक पैसाही घेतला नाही. पुढे मार्गस्थ झाल्यावर आरटीओच्या भरारी पथकाने खेड टोलनाक्‍यावर आमची गाडी पकडली. तेथील खेडच्या एसटी आगारात ठेवली आणि सोमवारी (ता.18) येण्यास सांगितले. त्यानुसार कार्यालयात दंड भरण्यासाठी आलो आहोत. तर कर्मचारी-अधिकारी उपस्थित असतानाही आमचा दंड स्वीकारण्यात आलेला नाही. 1 जून रोजी येण्यास सांगत असून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रियाज शेख व महम्मद इनामदार म्हणाले, "वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम्हाला मेमो दिला आहे. सहकार्य केल्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. सकाळपासून दंड भरण्यासासाठी आलोय, पण दंड स्वीकारलेला नाही. गाड्या जप्तच असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.''

वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. पण त्यांच्याकडे कागदपत्रे अपुरी असल्यामुळे दंड स्वीकारला नाही. 

- सुबोध मेडसीकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com