पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनमध्ये किराणा दुकानांसाठी काय आहेत नियम, वाचा

पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनमध्ये किराणा दुकानांसाठी काय आहेत नियम, वाचा

पिंपरी : लॉकडाउनच्या आदेशानुसार शहरात सर्व व्यापारी दुकाने, किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेत्यांची दुकाने मंगळवारपासून (ता. १४ ते १८ जुलै) या कालावधीत पुर्णतः बंद राहतील. त्याचप्रमाणे ऑनलाइन कंपन्याचा खाद्यपुरवठा (ता. १४ ते २३ जुलै) या कालावधीत रात्री १२ पर्यंत बंद राहणार आहे. 

अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करणारी दुकाने रविवारपासून (ता. १९ ते २३जुलै) या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने बंद राहतील.  त्याचप्रमाणे भाजी मार्केट, मंडई, आठवडे बाजार, आडत, फेरीवाले, दैनिक बाजारासह (ता. १४ ते १८ जुलै)  संपूर्णपणे बंद राहील. त्यानंतर (ता. १९ ते २३ जुलै) आठवडे बाजार, अधिकृत फळ व भाजीपाला विक्री सकाळी ८ ते दुपारी १२ सुरू राहील. त्याचप्रमाणे मटण, चिकन, अंडी, मासे यांच्या विक्रीचे नियोजनही याचप्रमाणे राहील. (ता. १९ ते २३जुलै) या कालावधीत केवळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत विक्री सुरू राहील. दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरण संपूर्ण कालावधीत सूरळीत सुरू राहील. गॅस वितरण देखील  नियमानुसार सुरू राहील. 

ओळखपत्र व परवाना अत्यावश्यक

दरम्यान, या सेवा  वगळून इतर कोणीही दुचाकी व चारचाकीवर फिरू शकत नाही. शासकीय सेवेतील कर्मचारी, मेडिकल, कृषी, बी बियाणे, गॅस वितरक, पाणीपुरवठा या सर्वांकडे ओळखपत्र व वाहन परवाना गरजेचे आहे. अन्न, औषध पुरवठा, प्रक्रिया व  निर्यात उद्योग नियमनुसार सुरू राहील. मात्र, एमआयडीसी पोर्टल वरून घेण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य राहतील. अद्यापपर्यंत परवानगी घेतलेल्या उद्योगांनी एमआयडीसी पोर्टलवरून परवानगी घ्यावी. शेतमालाशी कृषी निगडित प्रक्रिया उद्योग नियमानुसार सुरू राहतील. जीवनवश्यक वस्तू, औषधे, व घरपोच अन्न वाटप सकाळी 8 ते 10 या वेळेत महापालिका पूर्व परवानगी म्हणजे पास अत्यावश्यक आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com