व्यवसाय ठप्प झाला म्हणून तो थांबला नाही; जिद्दीने भिडला अन् हा नवा व्यवसाय सुरू केला

व्यवसाय ठप्प झाला म्हणून तो थांबला नाही; जिद्दीने भिडला अन् हा नवा व्यवसाय सुरू केला

पिंपरी : ऐन लग्नसराईच्या मोसमात कोरोनाचे संकट आलं...त्यामुळे या काळात तेजीत असणारा जनरेटरचा धंदा पूर्णपणे ठप्प झालाय...आता काय करायचं...घर कसं चालवायचं....ही चिंता दोन महिन्यापासून सतावत होती. नवीन व्यवसाय काय करता येईल का, यासाठी सारखा डोक्‍याला ताण देत होतो. मात्र, काहीच सूचत नव्हतं...अखेरीस आताच्या घडीला पंक्‍चर ऑन व्हिलचा व्यवसाय चांगला चालू शकतो, हे समजलं आणि अवघ्या काही दिवसांत त्याला सुरुवात केली...त्यामुळे आपल्यासमोर उभी असणारी घर चालवयाची भ्रांत आता तरी मिटली आहे, थेरगावमधील दत्तनगर भागातील युवक सागर आदक सांगत होता. 

दहा ते पंधरा वर्षांपासून सागर जनरेटर भाड्याने देण्याचा व्यवसाय करतोय. त्यामधून महिन्याकाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळत होते, त्यामधून घर चालायचं. अचानकपणे मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. त्यानंतर लगेच लॉकडाउन लागला आणि मग काय सगळंच बंद झाले. त्यामध्ये जनरेटर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. दोन महिन्यांपासून घरी असणाऱ्या सागरला रोजी रोटीचा प्रश्‍न कसा सोडवायचा हा प्रश्‍न होता.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर पंक्‍चर ऑन व्हिलचा उपक्रम सुरू केला, तर तो आताच्या काळात चांगला चालेल, म्हणून त्याने दहा केव्हीचा जनरेटर, एक कॉम्प्रेसर, पंक्‍चर काढण्यासाठी आवश्‍यक असणारा डाय, एक जुना टेम्पो याची खरेदी करून एक लाख 30 हजार रुपयांमध्ये पंक्‍चर ऑन व्हिलची गाडी तयार केली. एखाद्या ठिकाणी गाडी पंक्‍चर झाली, तर तिथे जाउनही गाडीची दुरुस्ती करता येणार आहे. सुरुवातीला डांगे चौक आणि आजूबाजूच्या परिसरात ही गाडी चालवणार आहे, त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून याचा विस्तार कसा करायचा, हे ठरवू असे सागरने सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नव्या संकल्पनांना चांगला वाव.... 

लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामध्ये नव्या संकल्पना घेऊन पुढे येणाऱ्यांना चांगला वाव मिळू शकतो. नवी संकल्पना शोधण्यासाठी थोडा डोक्‍याला ताण दिला तर ती सापडू शकते, संकल्पना राबवताना त्याच्या कमीत कमी खर्चात ती कशी राबवता येईल याचा विचार देखील करण्याची गरज आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com