सकाळ एज्यु-एक्स्पो : दहावी-बारावीनंतर करिअरच्या संधी

‘सकाळ’तर्फे चिंचवडमध्ये शनिवारपासून आयोजन
Sakal Edu-Expo 2022 Career opportunities after 10th-12th for student pimpri
Sakal Edu-Expo 2022 Career opportunities after 10th-12th for student pimprisakal

पिंपरी : शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था कोणत्या?, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या चांगल्या संधी कोणत्या? यांसह शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. निमित्त आहे, ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शनिवार (ता. १८) व रविवारी (ता. १९) चिंचवड येथे आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’चे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील नामांकित शिक्षण संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. त्यात ‘दहावी-बारावीनंतर करियरच्या संधी’, ‘लिबरल आर्ट्स व लॉ’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व शैक्षणिक पर्यायांची माहिती मिळेल. कनिष्ठ महाविद्यालयापासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करियरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळू शकणार आहे. वेगवेगळ्या विद्याशाखा, अनेक महाविद्यालये यांचा समावेश प्रदर्शनात असेल. एज्युकेशन एक्स्पोचे मुख्य प्रायोजक भारती विद्यापीठ आहे. एमआयटी आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज आळंदी हे सहप्रायोजक आहेत. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सहयोगी प्रायोजक आहेत.

काय असेल प्रदर्शनात?...

महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाइन, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येणार आहे. त्याचबरोबर नाटा, जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे.

आमच्या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी कस्टमाइज एज्युकेशन पॅकेज ऑफर आहे. अभियांत्रिकीसोबतच फोटोग्राफी, स्केचिंग यासारखे वेगवेगळे विषय पर्याय निवडता येणार आहेत. प्रदर्शनात येऊन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाईल.

-थॉमस आगमकर,मार्केटिंग ॲण्ड ब्रॅंडिंग हेड, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, चऱ्होली

आम्ही एज्यु-एक्स्पोकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहोत. विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यांना आमच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे.

- डॉ. पंडित माळी, कार्यकारी संचालक, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ताथवडे

आमच्याकडे पदवीचे सात व पदव्युत्तर पदवीचे पाच कोर्स आहेत. शिक्षण घेतानाच प्लेसमेंटची सुविधा आहे. प्रत्येक विषयाची स्वतंत्र लॅब आहेत. डिजिटल ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमधूनच पुस्तके दिली जातात. आतापर्यंत ८० ते ९० टक्के प्लेसमेंट झाली आहे.

- डॉ. बाळासाहेब वाफारे, प्राचार्य, एमआयटी आर्ट्‌स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, आळंदी

पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनातून गतिमान शिक्षणातून सामाजिक परिवर्तन या उद्देशाने भारती विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थी, पालक, समाज व उद्योग यांना केंद्रबिंदू मानून बारा शैक्षणिक शाखांद्वारे शिक्षण दिले जात आहे. त्याबाबतची माहिती प्रदर्शनातून मिळेल.

- सचिन वेर्णेकर, अधिष्ठाता, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, भारती विद्यापीठ, पुणे

एज्यु-एक्स्पो अत्यंत उपयोगी उपक्रम आहे. एका छताखाली शेकडो करिअरच्या संधींबद्दल माहिती त्यातून मिळणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व योग्य शिक्षणाच्या विविध पर्यायाची दिशा मिळते. आम्हालादेखील विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे, याची माहिती मिळते.

- संदीप पाचपांडे, चेअरमन, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पिंपरी

दहावी-बारावीनंतर करिअर करण्यासाठीचे विविध पर्याय प्रदर्शनातून कळणार आहे. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची महाविद्यालये आणि नूतन महाविद्यालयांत शिकवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा.

- डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पीसीईटी, निगडी-प्राधिकरण

काय? कुठे? कधी? केव्हा?

कोणासाठी? : विद्यार्थी व पालक

काय? : सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो २०२२

कुठे? : ऑटो क्लस्‍टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

कधी? : शनिवार, १८ व रविवार १९ जून २०२२

केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८

हेल्पलाइन

सेमिनारसाठी संपर्क : रोशन - ९५४५९८११५९

अधिक माहितीसाठी संपर्क : अमित - ९८८१९०७२५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com