Kirtan Mahotsav : ‘सकाळ’तर्फे सोमवारपासून कीर्तन महोत्सव

‘सकाळ’च्या पिंपरी -चिंचवड कार्यालयाचा ३१ वा वर्धापन दिन यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन सोमवारपासून (ता. २०) केले आहे.
Sakal Kirtan Mahotsav
Sakal Kirtan Mahotsavsakal

पिंपरी - पंढरपूरची कार्तिक वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी दिन सोहळा आणि ‘सकाळ’च्या पिंपरी -चिंचवड कार्यालयाचा ३१ वा वर्धापन दिन यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन सोमवारपासून (ता. २०) केले आहे. त्याअंतर्गत शहरातील विविध भागांत नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी आणि त्यांचे पूजक भागवत तथा वारकरी संप्रदाय. हीच भागवत धर्माची पताका हाती घेऊन वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यावर कळस चळवलेले जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज, त्यांच्यासह सखल संतांचा अमृतानुभव म्हणजे पंढरपूरची पायी वारी. मग ती वारी आषाढी एकादशीला असो वा कार्तिक एकादशीला, प्रत्येक वारी वारकरी मोठ्या श्रद्धेने करतो.

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चातुर्मासात बहुतांश कीर्तनकार पंढरपूरच्या बाहेर पडत नाही. सध्या पंढरपूर कार्तिक यात्रा सुरू आहे. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना वेध लागतात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचे. हा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे.

बहुतांश वारकऱ्यांची पाउले आळंदी, पंढरीकडे वळली आहेत. जे वारकरी किंवा भाविक काही कारणास्तव पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ‘सकाळ’ने कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

कीर्तनाची तारीख, वेळ, कीर्तनकार आणि ठिकाण

सोमवार, ता. २०, सायं. ५

जयेश महाराज भाग्यवंत, मुंबई

निळूभाऊ फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव

मंगळवार, ता. २१, सकाळी १०

समाधान महाराज शर्मा, बीड

संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालय (द्रौपदा लॉन्स), कस्तुरी चौक, वाकड

बुधवार, ता. २२, सायं. ५

पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी

गदिमा नाट्यगृह, आकुर्डी-प्राधिकरण

गुरुवार, ता. २३, सायं. ५

भागवत महाराज साळुंखे, आळंदी

शुक्रवार, ता. २४, सायं. ५

विशाल महाराज खोले, मुक्ताईनगर

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

प्रवेशिका मिळण्याची वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत

अधिक माहितीसाठी संपर्क - किरण - ७३८७०९८८९७

प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे -

  • ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालय, कोहिनूर बी झोन, पाचवा मजला, विजय सेल्सजवळ, पिंपरी - ९८८१०९९४३५

  • निळूभाऊ फुले नाट्यगृह : परशुराम सैद - 8888856027

  • संत तुकाराम मंगल कार्यालय (द्रौपदा) वाकड : दीपक महाडिक - 99221 11296

  • मा. नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांचे कार्यालय चिंचवड - ७७१९०९२९२९

  • दिनेश ॲडव्हर्टायझिंग, निगडी प्राधिकरण - ८९७५७६१८६3

  • प्रशांत ऑटो केअर, नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ, पिंपरीगाव - ९८२२६६००४६

  • गुरुकृपा बुक स्टॉल, भोसरी बीआरटी बसस्टॉपजवळ पुणे-नाशिक महामार्ग, भोसरी - ९८५००३९७११

  • अभय ॲडस्‌, चापेकर चौक, चिंचवड - ८९७५००२०९९

  • प्रतिबिंब फोटो स्टुडिओ, जुनी सांगवी, लक्ष्मीनगर - 9822343345

  • जिजाऊ डेअरी देवकर पथ, पिंपळे गुरव - 9881727779

  • किंगस्टाईल ड्रेसेस, नंदनवन कॉलनी, कृष्णा चौक, नवी सांगवी : 8087813814

  • अमृता कलेक्शन, दत्त मंदिर शेजारी, शिंदे वस्ती, रावेत - 9764095610

  • जगताप न्यूज पेपर एजन्सी, गणेश कामगार मंडळ, दत्तवाडी, आकुर्डी - 9922888864

  • दत्त न्यूज पेपर एजन्सी, वाकड - 9822332863

  • हॉटेल तत्व, दत्त मंदिर रोड वाकड - 8007081001

  • समृद्धी ट्रॅव्हल्स, भूमकर चौक, वाकड, ऑस्कर मिसळच्या जवळ - 9960200402

  • संदीप कस्पटे जनसंपर्क कार्यालय, कस्पटे वस्ती, वाकड - 8421535111

  • भारती विनोदे जनसंपर्क कार्यालय, सोनचाफा बिल्डिंग, द्रौपदा लॉन्स समोर, हिंजवडी रोड, वाकड - 7028354599.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com