Sakal Vastu Property Expo : पिंपरी चिंचवडमध्ये आलिशान घर घेण्याची सुवर्णसंधी!

गृहप्रकल्पाची ठिकाणे वेगवेगळ्या भागात असल्यामुळे सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणूनच ‘सकाळ’ने ‘प्रॉपर्टी एक्स्पो’च्या निमित्ताने एकाच छताखाली अनेक बांधकाम व्यावसायिकांना आणले आहे.
Sakal vastu Property Expo
Sakal vastu Property ExpoSakal

पिंपरी - प्रत्येक व्यक्ती जीवनाकडे एका दृष्टिकोनातून बघतो. त्याचे प्रथम ध्येय असते, स्वत:चे शिक्षण पूर्ण करणे. त्यानंतर हवी असते चांगली नोकरी. नोकरीनंतर लग्न, मुले, मुलांचे चांगले शिक्षण आणि साधारणतः चाळीशीनंतर स्वतःचे घर शोधणे. तेही मनासारखे. प्रशस्त. स्वप्नातले.

पण, दररोजच्या धावपळीत मनासारख्या घराचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसतो. गृहप्रकल्पाची ठिकाणे वेगवेगळ्या भागात असल्यामुळे सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणूनच ‘सकाळ’ने ‘प्रॉपर्टी एक्स्पो’च्या निमित्ताने एकाच छताखाली अनेक बांधकाम व्यावसायिकांना आणले आहे.

शनिवारपासून (ता. १२) डांगे चौकाजवळ ताथवडे येथे ‘एक्स्पो’ आयोजित केले आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गामुळे (मुंबई-बंगळूर महामार्ग) मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे निलख या गावांच्या विकासाला चालना मिळाली आहे. गावांच्या दोन्ही बाजूस गावे आहेत. शिवाय, औंध-रावेत बीआरटी मार्ग आहे.

दोन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी वाकड, काळाखडक, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे भागात अंतर्गत रस्ते आहेत. त्यांचे रुंदीकरण आता झाले आहे. त्याजोडीला प्रस्तावित १८ नवीन रस्ते विकसित केले जाणार आहेत. बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १२ मीटर रुंद सेवा रस्ता विकसित करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. काही भागात नवीन रस्ते झाले आहेत.

उद्यानांची उभारणीही केली जात आहे. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्था, व्यापारी कंपन्यांनी या भागाला प्राधान्य दिले आहे. नागरिकांनीही स्वप्नातील घरांच्या पूर्तीसाठी पिंपळे निलख, पिंपळे सौदागरपाठोपाठ वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या गावांतील सदनिकांना प्राधान्य दिले आहे. सर्वांत झपाट्याने विकसित होणार परिसर म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

काय? कधी? कुठे? केव्हा?

  • काय? : सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो

  • कुठे? : सिल्व्हर बॅंक्वेट हॉल, रावेत बीआरटी रस्ता, डांगे चौकाजवळ, रामनगर, ताथवडे

  • कधी? : शनिवार व रविवार अर्थात १२ व १३ ऑगस्ट २०२३

  • केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

वाकड ते किवळे भागाची वैशिष्ट्ये

  • मुंबई, सातारा, कोल्हापूर, कोकण भागात जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी

  • ‘पीएमआरडीए’कडून प्रस्तावित रिंगरोडच्या सानिध्यात परिसर

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, महामार्ग, बाह्यवळण मार्ग, औंध-रावेत बीआरटी

  • नामांकित शिक्षण संस्थांची संकुले असून, केजीपासून पीजीपर्यंत सुविधा

  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंजवडी आयटी पार्क हाकेच्या अंतरावर

  • मुळशी व मावळ तालुक्यातील निसर्गरम्य भटकंतीची ठिकाणे जवळ

  • महापालिकेकडून रस्ते, पाणी, स्वच्छता अशा सुविधांवर भर

  • नामांकित रुग्णालये, मॉल्स, मल्टिपर्पज हॉल्स, हॉटेल्स उपलब्ध

‘सकाळ प्रापर्टी एक्स्पो’त काय?

  • वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर परिसरातील घरांचे पर्याय

  • एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार

  • वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचकेपर्यंतच्या आलिशान घरांची माहिती मिळणार

  • विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी गृहकर्जासंदर्भात माहिती देणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com