Sakal Vidya : दहावीनंतरच्या शिक्षणाबाबत चिंचवडला उद्या चर्चासत्र

नवीन शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल? याबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये चर्चा आहे.
sakal vidya
sakal vidyasakal

पिंपरी - नवीन शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल? याबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये चर्चा आहे. त्याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमी व ‘लर्निंग लेन्स ॲकॅडमी यांच्यातर्फे शनिवारी (ता. १०) चर्चासत्र आयोजित केले आहे. याचा लाभ सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही होणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजता चर्चासत्रास सुरवात होईल. शालेय अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका व विषयानुरूप झालेले बदल समजून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी चर्चासत्र महत्त्वाचे ठरणार आहे. यात संपूर्ण अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धत, विषयानुरूप योग्य नियोजन व आकलनावर भर असेल.

बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे असेल, या अनुषंगाने अभ्यास व वेळेचे नियोजन कसे असावे. अभ्यास कसा करावा, परीक्षेचे ओझे न बाळगता कसे सामोरे जावे. याविषयी समुपदेशन केले जाणार आहे. पुण्यातील ‘क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे नौशाद शेख आणि ‘लर्निंग लेन्स ॲकॅडमीचे इम्रान शेख मार्गदर्शन करतील.

दहावीचा अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्नमध्ये बदल झाल्याने नवीन पद्धतीप्रमाणे अभ्यासाचे नियोजन करताना विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन चर्चासत्रातून मिळणार आहे. दहावीनंतर मेडिकल, इंजिनिअरिंगव्यतिरिक्त उपलब्ध असणारे करिअरची पर्याय, विद्यार्थ्यांचा कल पाहून योग्य पर्यायांची निवड कशी करावी. दहावीनंतर होणाऱ्या विविध परीक्षा, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तर नामांकित शिक्षण संस्था व तयारी कशी करावी, याविषयी मार्गदर्शन चर्चासत्रातून मिळेल.

sakal vidya
Sakal Vidya Expo : शिक्षणातील संधींचा आजपासून महोत्सव; विद्यार्थ्यांना तीन दिवस मार्गदर्शन

काय? कधी? कुठे? केव्हा?

काय? : ‘दहावीनंतरचे शिक्षण’ विषयावर चर्चासत्र

कधी? : शनिवार, ता. १० जून

कुठे? : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

केव्हा? : सायंकाळी ५ वाजता

संपर्क : ८३७८९८७८३६

प्रवेश : विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com