दौंड  - भिडे गुरूजी यांचा दौरा रद्द, पण ४७ जणांवर गुन्हे दाखल

 बेकायदा जमाव जमवणार्या ४७ जणांविरूध्द गुन्हा दाखल
sambhaji bhide daund visit cancel crime against 47 people pune police
sambhaji bhide daund visit cancel crime against 47 people pune police sakal

दौंड : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या दौंड शहरातील दौरा रद्द झाला. परंतु त्यांच्या दौर्याला विरोध करण्यासाठी व स्वागतासाठी बेकायदा जमाव जमवणार्या ४७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा समावेश आहे.                         

  दौंड शहरात १७ जानेवारी रोजी संभाजी भिडे गुरूजी दौरा नियोजित होता. शहरातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन ते सायंकाळी ५ वाजता रायगड येथील प्रस्तावित ३२ मण स्वर्णसिंहासन संबंधी मार्गदर्शन करणार होते. दरम्यान त्यांना उशीर झाल्याने ते दौंड शहरात न येता शहरातील नगर मोरी मार्गे बारामतीच्या दिशेने रवाना झाले .

दौर्‍याच्या दिवशी शहरातील भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, आदी पक्ष व संघटनांकडून संभाजी भिडे गुरूजी यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी पदाधिकारी जमा झाले होते. त्यामुळे पोलिसांनी जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष अमित सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्यासह एकूण २६ जणांवर १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.

तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिडे गुरूजी यांच्या स्वागतासाठी जमून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष श्रीनाथ उर्फ बाळू ननवरे यांच्यासह एकूण २१ जणांवर १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस ठाण्याबाहेर उपोषण.....

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करणे आणि जमावबंदी उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी अश्विन वाघमारे, अमित सोनवणे, आदींच्या पुढाकाराने २० जानेवारी रोजी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com