sant tukaram maharaj palkhi departure from dehu towards pandharpur
sant tukaram maharaj palkhi departure from dehu towards pandharpur SAKAL

Ashadhi Wari 2022 : तुकोबारायांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

श्री संत तुकाराम महाराजांचा पालखीने आषाढी वारीसाठी देहूतून पंढरीकडे प्रस्थान

पिंपरी : संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखीने आषाढी वारीसाठी देहूतून पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. मुख्य देऊळ वाड्यातील भजनी मंडपात पादुकांचे झाले असून काही क्षणातच पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. पहाटेच चौघडाच्या निनादात धार्मिक विधींना सुरुवात झाली. महापूजा अभिषेक झाल्यानंतर घोडेकर मंडळींकडून पादुका मंदिरात आणल्या .

बाराच्या सुमारास मानाच्या दिंड्यांना प्रवेश देण्यात आला. २ वाजून २० मिनिटांनी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. मुख्य देऊळवाड्यात हरिनामाचा गजर सुरू असून काही वेळातच पालखी प्रदक्षिणेला सुरुवात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com