वादळात दुरवस्था झालेल्या शाळांनाअद्यापही दुरुस्तीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

एकीकडे शासन व पालक ऑनलाईन शिक्षणासाठी धडपड करताना दिसत आहेत मात्र ग्रामीण भागातील मुलांना मोबाईल इंटरनेट या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. ठराविक धनिकांच्या मुलांना या सुविधेचा लाभ घेता येत आहे.त्यामुळे कितीही ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवले जात असले तरी मात्र सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना कितपत मिळत आहे,हा एक मोठा प्रश्न आहे.

करंजगाव: जून महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मावळ तालुक्यात अतोनात नुकसान झाले. घरे, गोठे, पॉलिहाऊस,अनेक ठिकाणच्या शाळांं ह्या वादळी वाऱ्यात भक्ष्यस्थानी पडल्या.नागरिकांनी आपापल्यापरीने स्वतःची घरं, गोठे, पॉलीहाउस यांची डागडुजी केली मात्र, सर्वांच्या मुलांसाठी ज्ञानार्जनाचे ठिकाण असलेल्या शाळांची दुरुस्ती मात्र शासनाच्या लालफितीत अडकली आहे. या घटनेला तीन महिने उलटूनही राज्यकर्त्यांसह ग्रामस्थांनीही लक्ष दिले नाही.

लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

एकीकडे शासन व पालक ऑनलाईन शिक्षणासाठी धडपड करताना दिसत आहेत मात्र ग्रामीण भागातील मुलांना मोबाईल इंटरनेट या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. ठराविक धनिकांच्या मुलांना या सुविधेचा लाभ घेता येत आहे.त्यामुळे कितीही ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवले जात असले तरी मात्र सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना कितपत मिळत आहे,हा एक मोठा प्रश्न आहे. यामुळे शाळां शिवाय शिक्षण हे समीकरण ग्रामीण भागात काम करील की नाही ही शंकाच आहे,अशा परिस्थितीत गावातील शाळा-वर्गखोल्या यातील भौतिक सुविधा ह्या आत्याधुनिक असणे गरजेचे आहे. मात्र, नाणे मावळातील कोंडीवडे-जांभवली याठिकाणच्या शाळांवरील छप्पर उडून गेलेले असताना अद्याप त्यावर डागडुजी केलेली नाही.

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

दरम्यान याबाबत जिल्हा परिषद सदस्या शोभाताई सुदाम कदम म्हणाल्या,नाणे मावळातील साबळेवाडी वगळता जवळपास सर्वच शाळांचे दुरुस्तीसाठी इस्टीमेंट बनवून निधी मंजूर करण्यात आला आहे.आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कंपन्यांच्या मदतीने सर्वच शाळांची भौतिक गरज पूर्ण करून शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

पिंपरी-चिंचवडमध्ये 1240 नवे रुग्ण; 10 जणांचा मृत्यू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools damaged by stormi in june still await repairs