
पंजाब, हरियाणा व दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिंदे म्हणाले, ""ज्या देशातील शेतकरी पुढे गेला, तो देश पुढे जातो. शेतकरी मागे गेल्यास देशही मागे जातो.
पिंपरी - ""देशातील शेतकरी वाचला तरच, देश वाचेल,'' असे मत ज्येष्ठ अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. भोसरी एमआयडीसीतील वनौषधी उद्यानातील झाडे वाचवली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
थर्टी फर्स्टसाठी पर्यटकांची लोणावळ्याला पसंती
वृक्ष संवर्धन व संगोपनासाठी एमआयडीसीने भोसरीतील एक एकरचा भूखंड महापालिकेला दिला होता. महापालिकेने तो डॉक्टरांच्या निमा संस्थेला 21 वर्षांच्या कराराने वनौषधी वृक्ष लावण्यासाठी दिला होता. त्यानुसार निमाच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे सुमारे साडेचारशे दुर्मिळ औषधी वनस्पती व झाडे लावली आहेत. हा भूखंड एमआयडीसीने विकला असून, संबंधित व्यक्तीने झाडे काढून टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्यास निमाने विरोध केला असून, वनौषधी उद्यान वाचवावे, असे साकडे एमआयडीसी व महापालिकेला घातले आहे. त्यास पाठिंबा दर्शविण्यासाठी व महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यासाठी शिंदे बुधवारी महापालिका भवनात आले होते. त्या वेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""दुर्मिळ झाडांना निमाने लहान मुलांप्रमाणे जोपासले आहेत. 138 प्रकारची झाडे त्यांनी जगवली आहेत. सर्व झाडे आयुर्वेदिक आहेत. ती आपण वाचवली पाहिजे.''
प्राणी अंत्यविधीसाठी एक हजार रुपये शुल्क; "स्थायी'चा निर्णय
पंजाब, हरियाणा व दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिंदे म्हणाले, ""ज्या देशातील शेतकरी पुढे गेला, तो देश पुढे जातो. शेतकरी मागे गेल्यास देशही मागे जातो. सध्या आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. त्यामुळे देश मागे चालला आहे. तो पुढे जाण्यासाठी शेतकरी पुढे गेला पाहिजे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.''
Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये 139 नवीन रुग्ण; 210 जणांना डिस्चार्ज मिळाला