आकुर्डी तहसील कार्यालयात 'निराधार'साठी स्वतंत्र कक्ष 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कार्यवाही 

पिंपरी : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अंध, दिव्यांग, विधवा व ज्येष्ठ नागरिकांना मिळतो असतो. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे या योजनेसाठी पिंपरी-चिंचवड अतिरिक्त तहसीलदारांचा आकुर्डी- प्राधिकरण येथील कार्यालयात स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करावा आणि त्यावर नियंत्रण व पर्यवेक्षण कार्यवाहीचा अहवाल त्वरित द्यावा, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अतिरिक्त तहसीलदारांना दिला होता. त्यानुसार कक्ष स्थापन केला असून त्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. 

पिंपरी-चिंचवडसाठी 'हे' श्रेयवादाचं राजकारण बरं नव्हं!  

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. भौगोलिक विस्तारही मोठा आहे. शिवाय, अंध, दिव्यांग, विधवा व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरात व्यवस्था नव्हती. योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करणे व अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी पुण्यात जावे लागत होते. त्यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड अतिरिक्त तहसीलदारांच्या आकुर्डी-प्राधिकरण कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

कोविड सेंटरमध्ये काम करीत असल्याने महिलेला बेदम मारहाण; पिंपळे गुरवमधील धक्कादायक घटना 

त्यांनी कक्षास मान्यता दिली असून कक्षप्रमुख म्हणून नायब तहसीलदार विमल डोलारे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्या कामकाजावर नियंत्रण ठेवून पर्यवेक्षण करतील. तसेच, लिपिक भीमाशंकर बनसोडे यांच्याकडे यांनी शहरातील अर्जदारांचे रोजनानिहाय अर्ज स्वीकारणे, प्राथमिक छाननी करणे, आवश्‍यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अर्जदारांना कळविणे, छाननीत पात्र अर्ज संजय गांधी योजना शाखेच्या तहसीलदारांकडे पाठविणे आदी कामांची जबाबदारी सोपवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: separate room for niradhar in akurdi tehsil office