esakal | टोळक्‍याकडून तिघांवर कोयत्याने हल्ला; निगडीतील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

टोळक्‍याकडून तिघांवर कोयत्याने हल्ला; निगडीतील घटना 

पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सात जणांच्या टोळक्‍याने तिघांवर तलवार व कोयत्याने वार केल्याची घटना निगडी येथे घडली. 

टोळक्‍याकडून तिघांवर कोयत्याने हल्ला; निगडीतील घटना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सात जणांच्या टोळक्‍याने तिघांवर तलवार व कोयत्याने वार केल्याची घटना निगडी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जाकीर ऊर्फ डॅन्या पठाण (वय 21, रा. राहुलनगर, ओटास्किम, निगडी), रुतिक सकट (वय 20), बबल्या रणदिवे (वय 22, दोघेही रा. गुरूदत्त सोसायटी, दळवीनगर, ओटास्किम), अजय नाटेकर (वय 19, रा. संजयनगर, ओटास्किम), सचिन ऊर्फ सच्या जाधव (वय 19), मुन्या शेख (वय 21), भावेश ऊर्फ भाव्या बाविस्कर, (वय 18, तिघेही रा. राहुलनगर, ओटास्किम) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हरनामसिंग कांचनसिंग जुन्नी (वय 21, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) यांनी फिर्याद दिली. 

पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; महिलेला चटके देत केला अत्याचार

बुधवारी (ता. 2) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी हे संजयनगर येथील दुर्गामाता मंदिराजवळील कट्ट्यावर असताना आरोपी त्याठिकाणी आले. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांचे मित्र सातलींग संगोळगी व मारूती धोत्रे यांना पालघन, कोयता, फायटर असलेली तलवार, लोखंडी पाइपने बेदम मारहाण केली. फिर्यादीच्या पाठीवर, सातलींग यांच्या हातावर, तर मारुती यांच्या तोंडावर हत्याराने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

loading image