पिंपरी-चिंचवडमध्ये आज सात रुग्णांचा मृत्यू, तर कोरोनाबाधितांचा आकडा हजारावर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. मात्र, संसर्ग झालेल्यांची संख्या एक हजारावरच आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. मात्र, संसर्ग झालेल्यांची संख्या एक हजारावरच आहे. गेल्या आठवड्यात रोज 20 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी सात जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील दोन व शहराबाहेरील पाच रुग्णांचा समावेश आहे. तसेच, मृतांमध्ये पाच पुरुष व दोन महिला आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण 852 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात मू्र्तीदानाला प्रतिसाद; नियमांचे पालन करून बाप्पाला निरोप 

शहरात आज एक हजार सहा जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 46 हजार 516 झाली आहे. आज 246 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 33 हजार 109 झाली आहे. सध्या 12 हजार 555 सक्रीय रुग्ण आहेत. 

आज मयत झालेल्या व्यक्ती दिघी (स्त्री वय 65), भोसरी (पुरुष वय 78), शिंगोली (पुरुष वय 67), देहूगाव (पुरुष वय 57), मुळशी (पुरुष वय 73), तळेगाव (पुस्त्री वय 65), आळंदी (पुरुष वय 74) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven corona patients death in pimpri chinchwad on friday 28 august 2020