तळेगावात आज सात जण पॉझिटिव्ह, मावळातील एकूण रुग्ण संख्या आता...

टीम ई सकाळ
सोमवार, 29 जून 2020

तळेगावमधील सात जणांचे कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

वडगाव मावळ (पुणे) : तळेगावमधील सात जणांचे कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८७ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

 हेही वाचा-  Breaking : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना

तळेगावमधील एका बँक कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल २६ तारखेला पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील १४ कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तळेगाव येथे राहत असलेल्या चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ते राहत असलेल्या घरांचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील १६ जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तळेगाव येथील एका ४२ वर्षीय पुरुषाचा व त्याच्या ३४ वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २७ तारखेला त्यांना सर्दी, खोकला आदी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे ते खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. तेथे घेण्यात आलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील दोन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड : आज दुपारपर्यंत १५७ नवे पॉझिटिव्ह, तर बरे झालेले रुग्ण म्हणतायेत

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील एक ५७ वर्षीय पुरुष वैयक्तिक कामासाठी २६ तारखेला सातारा येथे चालला होता. शिरवळ येथील आरोग्य यंत्रणेकडून त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा तपासणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्याच्या नजीकच्या संपर्कातील सात जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८७ झाली असून, त्यात शहरी ३७ व ग्रामीण ५० जणांचा समावेश आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून, ४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. लोहारे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven people were found corona positive in talegaon