अन्‌ हरवलेले सोन्याचे ब्रेसलेट अखेर तिला मिळाले

सुवर्णा नवले
Monday, 1 June 2020

महिन्याच्या पगारातून पैसे साठवून सरफाच्या दुकानात भिशी लावली. अन्‌ मिळालेल्या पैशातून मोठ्या हौसेने सोन्याचे ब्रेसलेट तिने खरेदी केले. चक्क ते कधी हरवलं तिला समजलंच नाही. लॉक डाउनमुळे महिन्याचा पगार हातात नाही आणि दुसरीकडे दागिना हरविल्याने तिच्यावर आर्थिक संकटच कोसळले. ती हतबल झाली. मात्र, सर्व परिसरात शोधाशोध झाल्यानंतर सोन्याचे ब्रेसलेट देणारा 'तो' तिच्यासाठी देवदूतच ठरला.

आशा सोडून दिली होती; पण.. भिशीच्या पैशातून कमावलेला कष्टाचा दागिना असा मिळाला परत
पिंपरी - महिन्याच्या पगारातून पैसे साठवून सरफाच्या दुकानात भिशी लावली. अन्‌ मिळालेल्या पैशातून मोठ्या हौसेने सोन्याचे ब्रेसलेट तिने खरेदी केले. चक्क ते कधी हरवलं तिला समजलंच नाही. लॉक डाउनमुळे महिन्याचा पगार हातात नाही आणि दुसरीकडे दागिना हरविल्याने तिच्यावर आर्थिक संकटच कोसळले. ती हतबल झाली. मात्र, सर्व परिसरात शोधाशोध झाल्यानंतर सोन्याचे ब्रेसलेट देणारा 'तो' तिच्यासाठी देवदूतच ठरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंचवड येथील संभाजीनगर, थरमॅक्स चौक चिंतामणी सोसायटी येथे राहणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी घाईगडबडीत दैनंदिन बाहेरची कामं आवरत होत्या. त्यांनी रविवारी (ता.३१) सकाळी नेहमीप्रमाणे भाजी घेतली . त्यानंतर दूध आणण्यासाठी गेल्या. घरी गेल्यावरही त्या कामातच होत्या. त्यांची तब्बेत ठीक नसल्याने त्यांना ब्रेसलेट हरवल्याचे उशिरा लक्षात आले. त्यानंतर सर्व परिसरात त्यांनी शोधाशोध सुरू केली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंचवड फुले नगर येथे शिवानंद चौगुले यांचा वृत्तपत्र विक्री व दुध व्यवसाय आहे. सकाळी सात वाजता दूध घेतल्यानंतर कुलकर्णी यांचे ब्रेसलेट हुक सैल असल्याने तिथेच पडले.  मात्र, काही वेळाने ते चौगुले यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात विचारणा देखील केली. पण प्रतिसाद मिळाला नाही. ते सोने त्यांनी नीट ठेवले. एक दिवस वाट पाहून ते पोलिसांत जमा करणार तेवढ्यात त्या महिलेने सायंकाळी सर्वत्र फिरून झाल्यानंतर दुधाच्या दुकानात विचारणा करताच तिला ते ब्रेसलेट मिळाले.  अन्‌ जीव भांड्यात पडला.

पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी...

प्रतिमा कुलकर्णी यांनी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना फुल न फुलाची पाकळी मदत देऊ केली . पण शिवानंद चौगुले यांनी स्वीकारली नाही. मात्र कुलकर्णी यांनी 'अखेर माझा भाऊ माझ्या मदतीला धावून आला अशा शब्दांत त्यांचे आभार मानले. अन्‌ त्यांना गहिवरून आले. 

 चौगुले म्हणाले, 'माझे समाजकार्य आणि प्रामाणिकपणा हाच माझा खरा दागिना आहे.' त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She finally got the lost gold bracelet