'मावळातील सहकारी सोसायटी सचिवांची बदली करा', शिवसेनेची मागणी 

'मावळातील सहकारी सोसायटी सचिवांची बदली करा', शिवसेनेची मागणी 

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांची बदली करावी, अशी मागणी मावळ तालुका शिवसेनेने केली आहे. कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, अनिकेत घुले, धनंजय नवघणे, मदन शेडगे, अमित कुंभार, डॉ. विकेश मुथा, गणेश भोकरे, उमेश दहिभाते आदी पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधकांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की शासनाच्या दोन लाख रुपये कर्ज माफीच्या योजनेत अनेक शेतकरी पात्र झाले होते. मात्र, काही सोसायट्यांच्या सचिवांच्या हलगर्जीपणामुळे व कामचुकारपणामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही सोसायट्यांमधील सचिव गरीब व भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना जास्त रक्कम मंजुर करून कमी रक्कम त्यांच्या हातावर ठेवत असल्याच्या तक्रारी आहेत. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. जुने-नवे पीक कर्ज प्रकरण व पैसे भरणे हे रोख स्वरूपात न करता धनादेशाद्वारे करावे. शेतकऱ्यांना कर्ज माफीपासून वंचित ठेवणाऱ्या तसेच, त्यांची फसवणूक करणाऱ्या सचिवांची बदली करावी, अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com