मोशीतील पदपथ पादचारी नागरीकांसाठी की गाळेधारकांसाठी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 December 2020

भर पदपथाच्या मध्यभागी विक्रीसाठी मांडलेल्या विविध वस्तू, पार्किंग केलेल्या दुचाकी-चारचाकी, उखडलेले, झाडेझुडपे वाढलेले व अस्वच्छ असे पदपथ. ही ओंगळवाणी परिस्थिती आहे सध्या  मोशीतील  डुडुळगाव ते ते तळवडे दरम्यानच्या तीर्थक्षेत्र देहू-आळंदी बीआरटीएस रस्ता, मोशी प्राधिकरणातील स्पाईन रस्त्यासह सर्वच अंतर्गत रस्त्यांवरील.

मोशी - भर पदपथाच्या मध्यभागी विक्रीसाठी मांडलेल्या विविध वस्तू, पार्किंग केलेल्या दुचाकी-चारचाकी, उखडलेले, झाडेझुडपे वाढलेले व अस्वच्छ असे पदपथ. ही ओंगळवाणी परिस्थिती आहे सध्या  मोशीतील  डुडुळगाव ते ते तळवडे दरम्यानच्या तीर्थक्षेत्र देहू-आळंदी बीआरटीएस रस्ता, मोशी प्राधिकरणातील स्पाईन रस्त्यासह सर्वच अंतर्गत रस्त्यांवरील. 

या परिसरातील विविध पदपथांवर सध्या गाळेधारक, पाथरीवाले, हातगाडीवाले यांनी अवैधरीत्या अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आम्हा पायी चालणाऱ्या पादचारी नागरिकांना समोरून बेशिस्तपणे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांमुळे व पदपथाच्या मधोमध मांडलेल्या वस्तूमुळे अपघाताची टांगती तलवार डोक्यावर ठेवून धोका पत्करून भर रस्त्यांमधून चालावे लागत असल्याचे पादचारी नागरीक सुनील गोसावी व कावेरी फलके यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाॅईंटर -
* पादचारी नागरीकांना हे अपेक्षित आहे... 
देहू-आळंदी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत त्यामुळे या तीर्थक्षेत्रांकडे ये-जा करणार्‍या या बीआरटीएस रस्त्यावरील पदपथ मोकळे असणे. 
* या पदपथालगतच्या गाळेधारकांनी दुकानातील वस्तू पदपथावर न मांडता त्या दुकानातच ठेवणे.
* आपल्या दुकानांसमोरील पदपथ स्वच्छ व मोकळा ठेवणे. 
* भाजीसह अन्य वस्तू विक्रेत्यांनी पदपथावर न बसता ते पादचारी नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोकळे ठेवणे. 
* या पथारीवाले व हातगाडीवाले विक्रेत्यांनी मोशीतील अधिकृत भाजी मंडईमध्येच बसणे. 
* बीआरटीएस रस्त्यासह मोशी प्राधिकरणातील विविध रस्त्यावरुन वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने न येणे. 
*  गाळेमालकांनी गाळे भाडेतत्त्वावर किंवा विक्री करताना संबंधितांना आपल्या गळ्यातच विक्रीसाठी वस्तू ठेवण्यास सक्ती करणे. 
* महापालिका अतिक्रमण विभागाने वेळोवेळी कारवाई करावी व हे पदपथ पादचारी नागरीकांसाठी मोकळे करुन देणे.

भटक्‍या कुत्र्याला धडक देऊन ठार केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

शहरासह मोशी उपनगरांच्या सौंदर्यात भर पडेल व पदपथ गाळेधारकांसाठी नाहीत तर ते फक्त आणि फक्त पादचारी आम्हा पादचारी नागरिकांसाठीच आहेत. पदपथ मोकळे असले तरच आम्हाला निर्धास्तपणे पदपथावर चालणे शक्य होईल. 
- रमेश तिडके, स्थानिक पादचारी नागरीक.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sidewalks Moshi pedestrians or pedestrians