बापानेच केला मुलाचा खून

सततच्या वादातून बापानेच मुलाचा खून केल्याची घटना मोशी येथे घडली.
murder
murdersakal
Summary

सततच्या वादातून बापानेच मुलाचा खून केल्याची घटना मोशी येथे घडली.

पिंपरी - सततच्या वादातून बापानेच मुलाचा खून केल्याची घटना मोशी येथे घडली. खुनानंतर बापानेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

युवराज अशोक साळवे (वय २२, रा. मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. युवराज हा आई-वडील व मोठ्या भावासह येथे राहत होता. काही दिवसांपासून किरकोळ कारणावरूनही युवराज त्याच्या कुटुंबियांना मारहाण करायचा. गुरुवारी (ता. २३ ) रात्रीही युवराज व त्याच्या कुटुंबियांत वाद झाला. युवराजने आई व भावाला घराबाहेर काढले.

त्यानंतर युवराज व त्याच्या वडिलांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये वडिल अशोक याने युवराजला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती युवराजच्या बापानेच भोसरी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अशोकला ताब्यात घेतले. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com