विशेष तपासणी मोहिमेत वडगावमध्ये आढळले आठ पॉझिटिव्ह

विशेष तपासणी मोहिमेत वडगावमध्ये आढळले आठ पॉझिटिव्ह

वडगाव मावळ - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत शहरातील  सहा हजार कुटूबींयाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सुमारे २५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सर्वेक्षण मोहिमेत कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या ४० नागरिकांची स्वॅब टेस्ट करण्यात आली त्यापैकी आठ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तळेगाव दाभाडे येथील कोव्हिड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे अशी माहिती मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

बुधवारी दिवसभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे १४५ आरोग्य सेवक,  नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे,  मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकवर्ग, स्वयंसेवक, नगरपंचायत कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरातील डाॅ.दिनेश दाते, डाॅ.गौरव धंदुके, डाॅ.ज्योती बुतडा यांचे विशेष सहकार्य मिळाले. शहरात दिवसभर सर्वेक्षण सुरू असताना तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, तालुका  समन्वयक अधिकारी उमेश बागडे आदींनी भेट दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज शहरात दिवसभर लाॅकडाऊन असल्याने नागरिकांनीही आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com