esakal | दहावीचे विद्यार्थी हिरमुसले
sakal

बोलून बातमी शोधा

ssc

दहावीचे विद्यार्थी हिरमुसले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला दहावीचा (Ssc)ऑनलाइन निकाल शुक्रवारी (ता. १६) जाहीर केला. मात्र, त्यांची वेबसाइट (संकेतस्थळ) हँग झाल्याने निकाल पाहता न आल्याने विद्यार्थी व पालकांच्या आनंदावर विरजण पडले. शिक्षकही त्रस्त झाले. (ssc students upset)

मंडळाच्या maharesult.nic.in, mahahsscbord.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गूण, गृहपाठ, तोंडी व प्रात्याक्षिक परीक्षांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गूण आणि नववीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी ५० गुण याप्रमाणे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा: ‘सोबत आहोत, काळजी नको’; लोणकर कुटुंबीयांना CM उद्धव ठाकरेंनी दिला धीर

दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाची माहितीही ऑनलाइन भरण्याचे काम आजपासून सुरू झाले. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरण्यासाठी वेबसाइट सुरू केले. मात्र, अतिरिक्त भार पडल्यामुळे ते हँग झाले होते. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल भरण्यास पहिल्याच दिवशी अडचण आल्या. शिक्षक हैराण झाले.

हेही वाचा: पुढील शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा

असा तयार झाला निकाल

दहावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांचे नववीचे ५० गुण, दहावीच्या लेखी कामाचे ३० गुण आणि अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण अशा पद्धतीने सविस्तर नोंदी शाळास्तरावर तयार करून राज्य परीक्षा मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवल्या आहेत. त्याचे छापील रेकॉर्ड विभागीय मंडळाकडे समक्ष जमा केले आहे. ऑनलाइन मिळालेल्या माहितीवरून व मंडळाच्या प्रचलित नियमानुसार सवलतीचे गुण आणि एकत्रित विषयांच्या उत्तीर्णतेचे नियमांचा वापर करून निकाल तयार केला आहे, असे मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

बारावी अंतर्गत मूल्यमापन ऑनलाइन कामकाज माहिती भरण्यासाठी दिलेली लिंक अद्याप सुरू झाली नाही. जाहीर करण्यास बोर्डाने अतिघाई केली आहे. त्यामुळे शिक्षकही वैतागले आहेत.

- विक्रम काळे, प्राचार्य, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

loading image