
पिंपरी चिंचवड आगारातून ६३ दिवसांनी धावली लालपरी
पिंपरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employee )संपामुळे (Strike)तब्बल ६३ दिवसानंतर पिंपरी चिंचवड आगारातून (Pimpri Chinchwad depot)पहिली एसटी बस धावली आहे. वल्लभनगरमधून सोलापूर मार्गावर दोन एसटी रवाना झाल्या. पोलिस बंदोबस्तात एकूण तीन एसटी बस रस्त्यावर धावत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या आगारातील कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. दोन महिन्यानंतरदेखील संप मिटत नसल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासकीय सूचनेनुसार इतर आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता एसटी आगारात हजेरी लावली.
हेही वाचा: लोणावळ्यात 'बेभरवशाच्या' राजकारणाचा पुन्हा एकदा प्रत्यय
प्रशासनाने कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आगारातून आज (ता.१०)दुपारी १२ वाजून १५ मिनिटाने एमएच १४ बीटी ४६८२ क्रमांकाची एसटी सोडण्यात आली. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)ते सोलापूर या मार्गावर बस धावली. एसटी प्रशिक्षण केंद्र भोसरी येथील चालक विजय गव्हाणे आणि विजय वल्लभनगर आगारातील वाहक चेतना कोळी यांनी डेपोतून ही एसटी काढली. ही एसटी सोलापूरच्या दिशेने निघाली होती. तसेच १२.३०वाजता एमएच १४ बी.टी.१०९७ ही दुसरी एसटी श्री. कवले हे सोलापूर करिता घेऊन रवाना झाले आहे. आज दिवसभरात तीन एस.टी.बस सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन बस सोलापूरला मार्गस्थ झाल्या आहेत.
हेही वाचा: महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडीकरिता प्रयत्न ; छगन भुजबळ
अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एसटी प्रशासनाने पिंपरी पोलिस संरक्षण घेऊन बस रवाना केल्या. स्वारगेट आगारातूनही काही बसेस सुटल्या. अचानक फलाटावर लावण्यात आलेल्या या फेरीला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. या एसटीतून १० प्रवासी गाडीतून मार्गस्थ झाले.सद्यःस्थितीत तीन चालक व दोन वाहक कामावर रुजू झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक कंत्राटी चालक सेवेत रुजू झाले आहेत. काही भागात एसटी सेवा सुरू झाली आहे. यावेळी पिंपरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ, आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे, स्थानक प्रमुख गोविंद जाधव,सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हनुमंत गोसावी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक गोविंद जाधव, विभागीय कार्यालय सुरक्षा अधिकारी सौ. बनसोडे , पोलिस उपनिरीक्षक श्री. चाटे उपस्थित होते. आगाराच्या आवारात दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला.
Web Title: St Ran From Pimpri Chinchwad Depot After 63 Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..