हातातली काम जातायंत....उद्योग सुरु करा

Industry
Industry

उद्योगनगरीतल्या उद्योजकांमध्ये असंतोष, उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा....
पिंपरी - आमच्या हातात असणारी कामे आता जायला लागलीत....इथले उद्योग सुरु करण्याची परवानगी मिळाल्यावर आम्ही कुणासाठी काम करायचे...दीड महिन्यापासून असणाऱ्या लॉकडाउनमुळे मोठा आर्थिक फटका बसलाय...त्यामुळे आता फार वेळ न घालवता इथले उद्योग सुरु करण्यास परवानगी द्या...अन्यथा उद्योजक आणि कामगारांचे भवितव्य अवघड असल्याची कैफियत मांडत उद्योगनगरीत ठप्प असणारे कारखाने सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी इथल्या उद्योजकांनी सरकारकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या आठवड्यापासून चाकण, तळेगाव, रांजणगाव याबरोबरच ग्रामीण भागातील कारखाने सुरु झाले आहेत. तिथल्या कंपन्यांना आवश्‍यक असणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन उद्योगनगरीतील उद्योजक करत असतात. त्यांच्याकडून सुट्या भागांची मागणी येत आहे. मात्र, कोरोनाच्या रेड झोनमध्ये पिंपरी-चिंचवड परिसराचा समावेश आहे.

Video :...म्हणून 'हा' व्यवसाय सुरू करावा लागला

त्यामुळे सरकारकडून इथले कारखाने सुरु करण्यास परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील कंपन्यांनी आता हे काम दुसऱ्या उत्पादकांना दिले आहे, त्यामुळे आमच्या हातातली कामे आता हळूहळू जायला लागली आहेत. इथले उद्योग सुरु करण्यास उशीर झाला तर आम्ही कारखाना कसा चालवायचा, असा खडा सवाल इथल्या उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

सरकारने कन्टेन्मेंट झोन वगळता अन्य भागातील दुकाने, दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे, असे असताना इथले कारखाने सुरु करण्यात काय अडचण आहे, असा प्रश्‍न उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

लॉकडाउन झाल्यापासून आतापर्यंतच्या दीड महिन्याच्या कालावधीत उद्योगनगरीतील 22 हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे, त्यात अजून कारखाने बंदच आहेत, त्यामुळे दररोजचे नुकसान वाढत आहे, त्यामुळे इथला उद्योजक आणि कामगार जगणार कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

....पालकमंत्र्याकंडून प्रयत्न सुरु
उद्योगनगरीत बंद असणारे कारखाने सुरु व्हावेत, म्हणून उद्योजकांनी पालकमंत्र्याकडे दाद मागितली आहे. पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी गुरुवारी (ता. 6) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनी करुन इथल्या उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींची कल्पना दिली. त्यावेळी पिंपरी-चिंचवडचा परिसर हा कोरोनाच्या रेड झोनमध्ये येत आहे, त्यामुळे नियमात राहून कशा प्रकारे सुरु करता येतील, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव भूषण गगराणी यांच्याशी देखील यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितल्याचे बेलसरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com