पिंपरी-चिंचवडमधील 'या' चार रुग्णालयांना राज्य सरकारचा दणका

पिंपरी-चिंचवडमधील 'या' चार रुग्णालयांना राज्य सरकारचा दणका

पिंपरी : कोरोना रुग्ण व नातेवाइकांकडून खासगी रुग्णालये उपचारापोटी अधिक शुल्क वसूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा चार रुग्णालयांना राज्य सरकारच्या तक्रार निवारण समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवाय, उपचाराच्या बिलाची फेरतपासणी करून रुग्णांना आठ दिवसांत परतावा देण्याचे सूचविले आहे. 

काही दिवसांपासून खासगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याच्या तक्रारी महापालिकेसह सरकारकडे येत आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी महापालिका स्तरावर प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त एम. अशोक बाबू यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये महापालिका वैद्यकीय व लेखा परीक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने शहरातील आदित्य बिर्ला, डॉ. डी. वाय. पाटील, सिटी केअर, स्टार मल्टिस्पेशालिटी या रुग्णालयांना भेट देऊन तक्रारींची तपासणी केली. यापुढेही समिती खासगी रुग्णालयांना नियमित भेट देणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी आहे नोटीस 

रुग्णालयात रुग्ण दाखल शुल्क, एक्‍स-रे शुल्क व औषध खर्च यांची आकारणी राज्य सरकारच्या आदेशानुसार पीपीई किट वगळता अनुक्रमे चार हजार, साडेसात हजार व नऊ हजार रुपये याप्रमाणे करणे अपेक्षित आहे. मात्र, या व्यतिरिक्त इतर बाबींवर बिल आकारणी करणे योग्य नसल्याबाबत रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, उपचाराबाबत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई का करून नये, अशी विचारणाही नोटीसद्वारे केली आहे. तसेच, एकूण दाखल रुग्ण व वापरलेले किट यांचा ताळमेळ करावा, रुग्णांच्या बिलाची फेररचना करून परतावा द्यावा, एक आठवड्यात खुलासा करावा, रुग्णांना दाखल करून घ्यावे, कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम जमा करण्याचा आग्रह धरू नये, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे. कोरोना रुग्णांना येणे व जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असावे, रुग्णालयाने दरपत्रक दर्शनी भागात लावावे, दरपत्रकाप्रमाणेच बिल आकारणी केली जाईल, याची दक्षता घ्यावी, असा आदेशही समितीने रुग्णालयांना दिला आहे. 

राज्य सरकारने निश्‍चित केलेले दर 

  • रुग्ण दाखल शुल्क : 4000 
  • एक्‍स-रे शुल्क : 7500 
  • औषध खर्च : 9000 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com