पिंपरी : आसमंतात फडकणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद, मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, शिवगीतांची साथ, अशा वातावरणात छत्रपती श्री संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले..निमित्त होते, मोशी प्राधिकरणात उभारलेल्या संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच शिल्प आणि शंभू सृष्टी यांना ढोल-ताशांनी दिलेल्या रोमहर्षक ऐतिहासिक मानवंदनेचे.हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ढोल-ताशा महासंघाच्या पुढाकाराने ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ ला मानवंदना देण्यात आली. गायक अवधूत गांधी यांनी ‘युगत मांडली’, ‘शिवरायांच्या बुद्धीयुक्तीचा लागना पारं’, ‘शिवबा राजं’ अशी गीते सादर केली. तीन हजारांवर ढोल, एक हजारपेक्षा अधिक ताशा आणि ५०० ध्वजांच्या गजरात ही मानवंदना देण्यात आली. कीर्तनकार संग्रामबापू भंडारे, प्रा. इंद्रजीत भोसले उपस्थित होते..भोसले म्हणाले, ‘‘हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचारांचा भावी पिढ्यांपर्यंत आणि जगभरात प्रचार - प्रसार करण्यासाठी स्मारकाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, पराक्रम, धर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी समर्पित होते. त्यांनी हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या विचारांना समर्पित असे काम ट्रस्ट करणार आहे.’’राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता आमच्या माता-भगिनींवर अन्याय होत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अन्यायाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ. वालचंदनगर येथे गतिमंद मुलीवर अत्याचार घडला, असे प्रकार खपवून घेणार नाही. अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिला..‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झाली आहे. याशिवाय मानवंदनेसाठी ढोल-ताशा पथकांच्या उपस्थितीचीही नोंदही पहिल्यांदाच झाली. याबद्दल ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’द्वारा हिंदूभूषण ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.