पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक

पिंपरी : महापालिकेच्या पथकातील कर्मचारी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेले असता, पथकातील कर्मचाऱ्यांना पाच जणांनी शिवीगाळ केली; तर एका महिलेने पथकाच्या दिशेने दगड मारला. याप्रकरणी पाच जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथील दत्तमंदिर रोड येथे घडली. सागर शरद वाघमारे, त्याच्या दोन बहिणी न अन्य दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

ऋषिकेश सुदेशकुमार कांबळे (वय २९) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागात काम करतात. ते त्यांच्या पथकातील कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, उपअभियंता राजेंद्र डुंबरे यांच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ अभियंता प्रविण धुमाळ, मनाली स्वामी यांच्यासोबत सोमवारी (ता.२२) सकाळी साडेअकरा वाजता दत्तमंदिर रोड, वाकड येथे शरद वाघमारे यांच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपींनी फिर्यादी कांबळे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. एका महिलेने पथकाच्या दिशेने दगड भिरकावला. वाकड पोलिस तपास करीत आहेत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com