मुलीच्या अपहरणाची कहाणी गैरसमजातूनच... सोशल मिडियाद्वारे चर्चांना बळ

बुरखा सदृष्य काळे कपडे आणि मास्क घातलेल्या व्यक्तीने सोसायटीतून मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेची वाकड परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.
social media
social mediaesakal
Summary

बुरखा सदृष्य काळे कपडे आणि मास्क घातलेल्या व्यक्तीने सोसायटीतून मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेची वाकड परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.

वाकड - बुरखा सदृष्य काळे कपडे आणि मास्क घातलेल्या व्यक्तीने सोसायटीतून मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेची वाकड परिसरात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून ही कहाणी केवळ गौरसमजातूनच जन्माला आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्या सोसायटीने व्हॅटसअप ग्रुपवर पत्र शेअर करून अपहरणाचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचा खुलासा केला आहे.

याबाबत माहिती अशी, शाळेतून घरी आल्यानंतर मैत्रिणींसमवेत पार्किंगमध्ये लपाछपी खेळताना अज्ञात व्यक्तीने शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेची दोन दिवस चर्चा रंगली होती तर काहींनी याची धास्तीही घेतली होती मात्र, वाकड पोलिसांनी सर्व अँगलचे सीसी टीव्ही कॅमेरे तपासून या घटनेचे सत्य समोर आणले आहे. त्यामुळे ती व्यक्ती दुसरी कोणी नसून सोसायटीत ११ व्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशी महिला असल्याचे वास्तव समोर आले आहे.

याबाबत वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेली माहिती अशी, ज्या जागी मुले खेळत होती तिथेच लिफ्ट असल्याने त्या रहिवाशी महिला रुग्णालयात जाण्यासाठी घाई-घाईत तेथून पास झाल्या. त्यांनी काळे कपडे, गॉगल परिधान केला होता तर रुग्णालयात जात असल्याने तोंडाला मास्कही लावले होते एवढाच काय तो साधर्म्य. मात्र घाबरलेल्या त्या मुलीने केवळ गैरसमजातून हा प्रकार घरी कथन केला आणि व्हॉटस अप ग्रुपवर अफवा आणि चर्चा सुरू झाल्या. हा सर्व प्रकार सीसी टीव्हीच्या मदतीने पोलिसांनी उघडकीस आणल्याने सोसायटीने देखील सोशल मीडियावर खुलासा करीत सोशल मीडिया काळजीपूर्वक हातळण्याची विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com