शिरगाव- परंदवडी पोलिसांकडून लाॅकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी; 'एवढ्या' जणांवर गुन्हे दाखल

Strict enforcement of lockdown in Shirgaon rules by Parandwadi police
Strict enforcement of lockdown in Shirgaon rules by Parandwadi police

बेबडओहोळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिरगाव परंदवडी पोलिसांनी लाॅकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी चालू केली. पोलीस जनजागृती करत असुन नियम मोडणारांवर गुन्हे दाखल करण्याची धडक मोहीम चालू केली आहे. अशा नियम मोडणाऱ्या १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या तीन दिवसांपासुन पाऊस पडत असल्याने बरेच हौशी पर्यटक लाॅकडाऊनच्या परीस्थितीची गांभीर्यता लक्षात घेत नसल्याने पवन मावळातील कुसगाव धरण परिसरात पर्यटन बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून या ठिकाणी जाण्यासाठी दारुंब्रे येथील गावाजवळ, पवना धरणाकडुन परंदवडी मार्गे बाहेर जाताना व कुसगाव फाटा येथे नाकाबंदी करून पर्यटकाना तसेच विना कामाचे बाहेर फिरणारे यांना रोखण्यात येत आहे तसेच नियम मोडून पर्यटनसाठी व विना काम बाहेर येणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत.अशा १७ जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

पुणेकरांनो ही चूक करु नका, नाहीतर... धडा शिकविण्याची प्रशासनाची भूमिका

यापुढे लाॅकडाऊन नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन परंदवडी शिरगाव पोलिसांकडुन करण्यात येत आहे. 


फायनान्स कंपनीलाच घातला 51 लाखांना गंडा; कसा? वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com