Pimpri News : पोलीस गणवेशातील मुलाखत पडली महागात; उपनिरिक्षक झेंडे निलंबित

ड्रीम्स इलेव्हनवर मिळाले होते दीड कोटींचे बक्षीस.
Somnath Zende
Somnath Zendesakal

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तायातील पोलीस उपनिरिक्षक ‘ड्रीम्स इलेव्हन’ ही ऑनलाईन गेम खेळल्यामुळे करोडपती झाला. दरम्यान, संबंधित पोलीस उपनिरिक्षकाने वरिष्ठांच्या परवानगीशिवाय वृत्तवाहिन्यांना गणवेशात मुलाखत दिली. त्यामुळे शिस्तभंग झाल्याचा ठपका ठेवत फौजदारास निलंबित करण्यात आले आहे.

सोमनाथ झेंडे असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोमनाथ झेंडे हे सध्या आरसीपी (दंगा काबू पथक) पथकात कार्यरत होते. १० ऑक्टोबर रोजी उर्से टोल नका येथे बंदोबस्तात असताना त्यांना ‘ड्रीम ११’ या ऑनलाईन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागल्याचे समजले. ही बातमी वेगाने सर्वत्र पसरली. अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मात्र, कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी कसा काय ऑनलाईन गेम खेळू शकतो, ड्रीम्स ११ हा एका प्रकारचा जुगार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करीत काहींनी झेंडे यांच्यावर टीका केली. तर, काहींनी नशीबवान आहे हा अधिकारी, अशा प्रतिक्रिया देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, झेंडे यांनी वृत्तवाहिन्यांना गणवेशात मुलाखत दिली. त्यामुळे पोलिसांना नेटकऱ्यांनी टार्गेट केले. या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. चौकशी नंतर मंगळवारी (ता. १७) झेंडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिल्याचे सहायक आयुक्त सतीश माने यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com